शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:14 PM2018-12-02T22:14:08+5:302018-12-02T22:14:34+5:30

खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा जिल्हा भंडाराच्या शिष्टमंडळाची तक्रार निवारण सभा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल.एल. पाच्छापुरे यांच्या दालनात शनिवारला पार पडली. यावेळी संघटनेनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या निकाली काढण्याचे सकारात्मक आश्वासन शिक्षणाधिकारी एल.एस. पाच्छापुरे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

Teachers' problems will need to be addressed | शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार

शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : खासगी प्राथमिक शिक्षक संघाची तक्रार निवारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा जिल्हा भंडाराच्या शिष्टमंडळाची तक्रार निवारण सभा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल.एल. पाच्छापुरे यांच्या दालनात शनिवारला पार पडली. यावेळी संघटनेनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या निकाली काढण्याचे सकारात्मक आश्वासन शिक्षणाधिकारी एल.एस. पाच्छापुरे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
शिक्षकांचे नियमित वेतन एक तारखेला अदा करणे, वेतन देयकासोबत अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करणे, सत्र २०१८ - १९ च्या संच मान्यतेनुसार रिक्त व अतिरिक्त पदाची माहिती प्रकाशित न करता समायोजन कार्यशाळा घेण्यावर संघटनेनी नाराजी व्यक्त केली असून जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत एकुण २९ जागा रिक्त आहेत व केवळ ११ शिक्षक अतिरिक्त झाले. त्यामुळे बिंदू नामावलीनुसार समायोजनाची कारवाई करावी, पंचशील प्राथमिक शाळा भागडी येथील प्रभारी मुख्याध्यापक रामचंद्र मेश्राम नियत वयोमानानुसार दि. ३० नोव्हेंबर २०१६ ला सेवानिवृत्त झाले. मात्र दोन वर्षाचा कालावधी होऊन देखील संस्थेने पेंशन प्रकरण सादर केले नाही. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचे पेंशन प्रकरण त्वरीत निकाली काढणेकरिता सचिव तथा मुख्याध्यापक यांना आदेश देण्यात यावे, शिक्षणाधिकारी यांचे आदेशाची अवहेलना करणाºया मुख्याध्यापकाची शिक्षक पदाची मान्यता रद्द करावी अशी संघटनेची तीव्र भूमिका आहे. दि.१२ डिसेंबर २०१८ पर्यंत पेंशन प्रकरणी निर्णय घेण्याचे शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले.
सत्र २००७-०८ मध्ये समायोजनाद्वारे पा.वा. नवीन मुलींची शाळा भंडारा येथे रूजू झालेल्या वनिता खोकले व शामली नाकाडे यांचे मूळ शाळेतील स्थगित वार्षीक वेतनवाढी मंजूर करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रूजू झालेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना जुनी पेंशन लागू असल्याने त्यांचे डीसीपीएस खातेवरील रक्कम जीपीएफ खातेवर वळते करावे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणी जिल्ह्यातील पात्र शिक्षकांची अद्यावत माहिती वेतन देयकासोबत सादर करण्याचे आदेश द्यावे, सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांची ग्रॅच्युएटी धनादेशाद्वारे न देता आरटीजीएस नुसार त्यांचे खातेवर वळते करावे, सत्र २०१२ -१३ पासूनची संच मान्यता दुरुस्तीचे आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेली प्रकरणे व निकाली काढलेली प्रकरणाची माहिती करविणे शालेय पोषण आहार मानधन नियमित देण्याची कारवाई करावे, तसेच माहे आॅगस्ट २०१८ पर्यंतचे इंधन व भाजीपाला मानधन शाळांच्या खातेवर वळते केले असून माहे आॅक्टोबरची प्रक्रिया सुरु आहे. अल्पसंख्यांक शाळा व रिक्त अतिरिक्त पदे तसेच नियुक्तीबाबतची माहिती देण्यात यावे, २० टक्के अनुदान टप्प्यावरील ममता प्राथमिक शाळा येरलीचे अनुदान वितरीत करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे, आरटीईनुसार शाळांना एक वर्षाची मान्यता न देता सलग तीन वर्षाची मान्यता देणे आदी विषयावर चर्चा झाली.
सभेला उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे, खासगी प्राथमिक संघ नागपुरचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर, केंद्रीय सचिव विजय नंदनवार, कार्याध्यक्ष रहेमततुल्ला खान, कोषाध्यक्ष गोपाल मुºहेकर, शहर कार्याध्यक्ष संजय बोरगावकर, शहर सचिव मोहन सोमकुवर, ग्रामीणचे ज्ञोनश्वर खंगारे, विमाशीचे संघटक तेजराम राजूरकर, संघटनेचे मार्गदर्शक राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण, सचिव विलास खोब्रागडे, तालुकाध्यक्ष कुणाल जाधव, तालुका सचिव विवेक मानकर, कार्याध्यक्ष धनवीर कानेकर, प्रभाकर मेश्राम, रुपेश नागलवाडे, सुनील मेश्राम, प्रेमलाल मलेवार व रामचंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.

Web Title: Teachers' problems will need to be addressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.