शिक्षकांनी संस्कारक्षम विद्यार्थी घडवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:16 AM2017-12-31T00:16:22+5:302017-12-31T00:17:02+5:30
मुली स्पर्धेत टिकायला हव्यात व अशी संस्कारक्षम आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थिंनी घडविणारी नूतन कन्या एक पथदर्शी शाळा आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुली स्पर्धेत टिकायला हव्यात व अशी संस्कारक्षम आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थिंनी घडविणारी नूतन कन्या एक पथदर्शी शाळा आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.
स्थानिक नूतन कन्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या दुसºया दिवशी ते बोलत होते. समाजाला सर्व क्षेत्राची गरज असते. असे गुणवत्तापूर्ण व अष्टपैलू शिक्षण देणारी नूतन कन्या ‘ मदर स्कूल’ आहे असेही वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मेंढेकर तर प्रमुख अतिथि म्हणून समीर गंगाखेडकर, डॉ. प्राजक्ता गंगाखेडकर, न्यू गर्ल्स स्कूल संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव बोंगीरवार, अॅड़ एम. एल. भूरे तसेच प्राचार्य नंदा नासरे मुख्याध्यापिका वर्षा देशपांडे, धास्कट आदि उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नंदा नासरे यांनी केले. नेतृत्व करणारा ‘ग्लोबल केझीन’ व माणुसपणं जणपारी कर्तव्यदक्ष पिढी शाळेतून घडविण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनी व राज्यस्तरीय खेळाडूंचा सन्मानचिन्ह देवून सत्कार व गुणगौरव करण्यात आला. १२५ वर्षांचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना दाखविणाºया शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे कार्य अप्रूप आहे असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथि डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. स्वप्न पहाणे व पूर्ण करण्यास जी शाळा शिकविते त्या शाळेचा सार्थ अभिमान असावा. सद्विचारांचा धागा विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जपूण स्वत:चे नावलौकिक वाढवितांना स्वाभिमान व अभिमान बाळगावा असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी एन.सी.सी. कॅडेट्सनी सैनिकांची कर्तव्यदक्षता व जीवनपट सादर करणारी एक भावनिक नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि व मार्गदर्शक समीर गंगाखेडकर यांनी विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील आव्हाने व त्यावर विचारमंथन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. भूदल, नौदल, व वायुदल या क्षेत्रातील मुलींसाठी संधीचा विद्यार्थिनींना पॉवर पॉईट प्रेझेंनटेशनद्वारे परिचय करुन दिला.