शिक्षकांनी केला राज्य प्राथमिक ‘संघात’ प्रवेश
By admin | Published: March 27, 2016 12:28 AM2016-03-27T00:28:47+5:302016-03-27T00:28:47+5:30
जिल्ह्यात कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांमध्ये होत असलेल्या गळचेपीने अनेक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला आहे.
भंडारा : जिल्ह्यात कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांमध्ये होत असलेल्या गळचेपीने अनेक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला आहे. मोहाडी येथे २१ तर पवनी येथे नऊ शिक्षकांनी प्रवेश घेतला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात संघाने शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी रेटून न्याय मिळवून दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची त्यांच्या संघात होत असलेल्या कुंचबनेमुळे तथा न्याय मिळत नसल्याने अनेक शिक्षकांनी सय्यद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघात प्रवेश केला आहे.
पवनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची कोंढा येथील अक्षय सभागृहात सभा घेण्यात आली. यावेळी नऊ शिक्षकांनी संघाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतला. यात रवी नखाते, प्रदीप कावळे, विलास शेंडे, कोमल घाटोळकर, लोमेश कोल्हे, हरिदास सावरबांधे, भगवान शेंडे, संतोष गुट्टे, डी. एन. शेंडे यांचा समावेश आहे. यावेळी रमेश लोणारे, रमेश नागपुरे, के. डी. भुरे, संजीव बावणकर, केशर माथुरकर, महेश गावंडे, उत्तम कुंभारगावे, मकरद घुगे, उमाजी देशमुख, विकास गायधने, दिलीप बावणकर, सुधिर वाघमारे, यामिनी गिऱ्हेपुंजे, राम पवार आदी शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
मोहाडी : पंचायत समितीच्या प्रांगणात धर्मार्थ प्याऊचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद युवराज वणवे, अनिल गयगये उपस्थित होते. यावेळी कार्यरत शिक्षकांच्या एका संघटनेत २१ शिक्षकांनी संघात प्रवेश केला. यात गोपाल निमजे, मनोहर बडवाईक, डी. जी. काळे, राजेश भोयर, अजय शहारे, लिलाधर माने, घनशाम पराते, पी.बी. कंगाले, शिवराज राठोड, संजय जाधव, गणेश धांडे, धोंडीराम हाके, संजय गजभिये, आर. टी. कुंभरे, डी. झेड. सरांडे, प्रेमराज बावनकुळे, कमलेश दुपारे, विनोद दुबे, वसंता चिंधालोरे, के. बी. गजभिये यांचा समावेश आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दिनेश गायधने, बाळासाहेब आंधळे, प्रकाश महालगावे, किशोर डोकरीमारे, सोनीराम मेश्राम, राजकुमार चांदेवार, नरेंद्र कोहाड, पी.के. कस्तुरे, राजकुमार मेश्राम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)