शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत लढा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:22+5:302021-02-24T04:36:22+5:30
भंडारा : शिक्षकांच्या समस्या मी स्वतः गत २८ वर्षांपासून अनुभवत आहेत. यासाठी काही प्रसंगी अधिकाऱ्यांच्या विरोधात तर कधी ...
भंडारा : शिक्षकांच्या समस्या मी स्वतः गत २८ वर्षांपासून अनुभवत आहेत. यासाठी काही प्रसंगी अधिकाऱ्यांच्या विरोधात तर कधी प्रसंगी स्वतःच्या जिवाचाही विचार न करता शिक्षक व शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे आणि ते यापुढेही सातत्याने मांडत राहणार, असे प्रतिपादन अंगेश बेहलपाडे यांनी केले.
भंडारा शहरातील नूतन महाराष्ट्र विद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यकारिणी सभेत त्यांची एकमताने राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष के. के. बाजपेयी, अशोक वैद्य, दिशा गद्रे, मनीषा काशीवार, सचिन तिरपुडे, अशोक रंगारी, के.डी. बोपचे, राधेशाम थोटे, राजेश निंबार्ते, राजू बारी, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, यादव गायकवाड, हरिहर पडोळे, प्रदीप गोमासे, लोकानंद नवखरे, पुरुषोत्तम डोमळे, पांडुरंग टेंभरे, नीलकंठ कापगते, सुभाष गरपडे, एस. सी. कुथे, अविनाश पाठक, प्रयान भाजीपाले आदी मान्यवर उपस्थित होते. अंगेश बेहलपाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीबाबत शिक्षक आमदार नागो गाणार यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी बेलपाडे यांनी शिक्षक परिषदेच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय दिल्याचे सातोना येथील शिक्षक सचिन तिरपुडे यांनी सांगितले. संचालन शिक्षक सुभाष गरपडे यांनी केले तर आभार अविनाश पाठक यांनी मानले.