बुद्धांच्या शिकवणीतच जीवनाचे सत्य

By Admin | Published: February 2, 2017 12:22 AM2017-02-02T00:22:28+5:302017-02-02T00:22:28+5:30

जीवनाचे सत्य बुद्धांच्या शिकवणीतच आहे. त्यामुळे तथागत गौतम बुद्ध यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसात करण्याची गरज आहे,

In the teachings of the Buddha, the truth of life | बुद्धांच्या शिकवणीतच जीवनाचे सत्य

बुद्धांच्या शिकवणीतच जीवनाचे सत्य

googlenewsNext

धम्ममेघा धम्मसंमेलन : भदंत संघरत्न मानके यांचे प्रतिपादन
भंडारा : जीवनाचे सत्य बुद्धांच्या शिकवणीतच आहे. त्यामुळे तथागत गौतम बुद्ध यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पय्यामेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न मानके यांनी केले.
चिखली हमेशा, राजेगाव एमआयडीसी खुटसावरी मार्ग, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसरात बौद्ध भिक्षु, हिंदी पाली साहित्याचे साहित्यकार डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांचा ११२ वा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
प्रारंभी पंचशील धम्मध्वजारोहण अ‍ॅड. एकनाथ रामटेके यांच्या हस्ते धम्मरॅली खुटसावरी मार्गावरून काढून समता सैनिक दलाचे विदर्भ जीओसी गजेंद्र गजभिये यांनी सलामी देवून त्यांनी जयभीम घोषात सिंहगर्जना केली. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मपत्नी, रमाई मातेच्या प्रतिमेचे अनावरण प्रा. रेखा मेश्राम रमाई क्रांतीची अग्रणी यांच्या हस्ते पार पडला. लीला रामटेके औरंगाबाद यांनी आपल्या वतीने लगत महागाजी बाळू रामटेके पाथरी चौ. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बोधिचेतिय संस्थेला दान केला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. धम्मदीप यांनी धम्मचक्र घुमवित बुद्ध का हुआ, परिनिर्वाण लिहून या स्वागत गीताला निरूता जांभुळकर आणि तिच्या सहकारिणींनी आपला स्वर देवून वाहवा मिळविली.
उद्घाटीका रेखा मेश्राम यांनी रमाई मातेची महत्ता पटवून दिली की जिने बाबासाहेबांना महान बनविले.
प्रा. भारत सिरसाट यांनी बाबासाहेबांच्या कार्य कुशलतावर प्रकाश टाकला. भदन्त धम्मदीप यांनी डॉ. भदंत आनंद कौसल्यायनवर प्रकाश टाकून त्यांच्याच जीवनावर डॉक्टरेट मिळविल्याची घोषणा केली.
अ‍ॅड. एकनाथ रामटेके यांनी धम्मदीक्षेच्या २२ प्रतिज्ञा श्रीत्यांकडून बदवून घेतल्यास व तंतोतंती पाळण्याची आग्रही भूमिका घेतली. भदंत सुक्ष्त बोधी यांनी बुद्ध धम्मावर गाढ श्रद्धा ठेवून भविष्य उज्वल करावे, असे आवाहन केले.
आम्रपाली बुद्ध भीम नृत्य मंडळ पेट्रोलपंप जवाहरनगर भंडाराच्या कलाकारांनी आपल्या नृत्यातील गीतातून बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे जीवन दर्शनातून झाँकी प्रस्तुत करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. भिक्षुंमध्ये लामा नेपाले, डॉ. भदंत अनिरूद्ध महाथेरो, भिक्षु धम्मज्योती, संघप्रिय, शीलधन, जीवक उपस्थित होते. राजू वाहने आणि पप्पू यांचा नवीन कपडे देवून अ‍ॅड. एकनाथ रामटेके परिवारांनी सम्मान केला.
अ.शि. रंगारी, साहित्यीक, अमृत बन्सोड, विनोद रामटेके, गजानन मेश्राम, केशव रामटेके, एम.एम. मेश्राम, मधुकर मेश्राम, आर.डी. रामटेके, सुगंधा साखरे, ज्योत्सना बागडे, सागर काणेकर, विठोबा कांबळे, कृष्णराव काळबांडे, देवदास देशपांडे, सुर्यकांता डोंगरे, प्रभाकर गोस्वामी, सुनिल शहारे, दीपक पाटील आणि त्यांच्या महिला मंडळ प्रतिमा मेश्राम, कुसुम सरजारे, रेखा डोंगरे, निलकंठ कायते, प्रभाकर बुंदेले, सुनंदा देशपांडे, देवानंद नंदेश्वर पत्रकार आणि त्यांचा परिवार, भदंत नंदागवळी धम्म्सेवक सेविकात सुषमा भाऊराव वासनिक, चांगुना कांबळे, अर्चना खोब्रागडे, रंभा श्राद्धे, रत्नमाला वासनिक, मालती गडकरी, रचना वैद्य, शीला साखरे यांनी केले.
पुस्तकला नंदागवळी, द्वारका काणेकर, यशोधरा खोब्रागडे, शुक्रतारा गजभिये, लता उके, ज्योती मेश्राम, शोभा मेश्राम, कुंदा बारसागडे, ब्रिजबल ठवरे, मच्छु फुले, विनोद बोरकर, धमेंद्र बडोले, रूस्तम बोरकर, डॉ. नरेश साखरे, रामकृष्ण कांबळे, ईश्वर बन्सोड, दिनेश रामटेके, वीरेंद्र खोब्रागडे, विलास लेंडे, आदेश बांबोडे, ज्ञानपाल बडोले, निखिल पोटवार, सिताराम वासनिक, केवळ भोयर, दुधराम शेंडे, अनमोल कांबळे, जयदेव डोंगरे, बी.एस. नंदा, मनोज वासनिक आदी उपस्थित होते. मान्यवरांचा संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. आभार पुरूषोत्तम तिरपुडे व अमरदीप बोरकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: In the teachings of the Buddha, the truth of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.