सागवानाच्या लाकडाने भरलेला मिनीट्रक भंडारा जिल्ह्यात पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:07 AM2019-06-28T10:07:53+5:302019-06-28T10:08:15+5:30

शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनी ट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Teak wood filled truck caught in Bhandara district | सागवानाच्या लाकडाने भरलेला मिनीट्रक भंडारा जिल्ह्यात पकडला

सागवानाच्या लाकडाने भरलेला मिनीट्रक भंडारा जिल्ह्यात पकडला

Next
ठळक मुद्देदेवरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनी ट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
प्राप्त माहीतीनुसार देवरी पोलिसांची एक चमू ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वात शेंडा परिसरात गस्तीवर होती. दरम्यान, पुतळीच्या जंगलातून जात असताना रस्त्याच्या एका बाजूला प्रकाशाचा झोत चमकल्याने पोलीस चमू सतर्क झाली. त्या जागेचा कानोसा घेत पोलीस पथक घटना स्थळाकडे येत असल्याचे पाहून वन तस्करांनी तिथून पळ काढला. मात्र, सागवानाचे सुमारे सहा लाकडे भरून असलेला ट्रक पोलिसांच्या हाती लागला. सदर मिनीट्रक हा पोलिसांनी सडकअजुर्नी वनविभागाच्या स्वाधीन केला. या प्रकरणी वनविभाग काय कार्यवाही करते, या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उल्लेखनीय म्हणजे शेंडा आणि लगतच्या जंगलातून होणाºया वनतस्करीवर वनविभागाचे वचक नसल्याने वनतस्करांचे चांगलेच फावत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. वनविभागाच्या सुस्त कारभारामुळे जंगलांचे अस्तित्व धोक्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.

Web Title: Teak wood filled truck caught in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.