१६७ कोटींच्या भूमिगत गटार योजनेला तांत्रिक मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:42+5:302021-07-18T04:25:42+5:30

भंडारा शहरातील मोडकळीस आलेली जुनी पाणीपुरवठा योजना भंडारेकर यांची तहान भागविण्यासाठी अपुरी असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ...

Technical approval for 167 crore underground sewerage scheme | १६७ कोटींच्या भूमिगत गटार योजनेला तांत्रिक मान्यता

१६७ कोटींच्या भूमिगत गटार योजनेला तांत्रिक मान्यता

googlenewsNext

भंडारा शहरातील मोडकळीस आलेली जुनी पाणीपुरवठा योजना भंडारेकर यांची तहान भागविण्यासाठी अपुरी असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नवीन अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पाठपुरावा केला. वर्षभरापूर्वी या योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. शहरात या योजनेचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या माध्यमातून भंडारेकरांना २४ तास शुद्ध पाणी देण्याचा मानस पूर्ण होणार आहे. योजनेसोबत भूमिगत गटार योजनेसाठी नगराध्यक्षांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर भंडारा शहरासाठी भूमिगत गटार योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. या मान्यतेसाठी काही दिवसांपूर्वीच भंडारा नगर परिषदेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याचा अभ्यास करून अखेर ही तांत्रिक मान्यता दिली गेली आहे. तांत्रिक मान्यता मिळाल्याने लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Web Title: Technical approval for 167 crore underground sewerage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.