स्टेट बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड

By admin | Published: November 15, 2016 12:27 AM2016-11-15T00:27:30+5:302016-11-15T00:27:30+5:30

भारतीय स्टेट बँकेची तुमसरातील एटीएम मागील चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे.

Technical failure in SBI's ATM | स्टेट बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड

स्टेट बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड

Next

चार दिवसांपासून एटीएम बंद : तुमसरात चार दिवसांत १० कोटी रूपये बँकेत जमा
तुमसर : भारतीय स्टेट बँकेची तुमसरातील एटीएम मागील चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. रविवारी नागरिकांना येथे दोन हजाराच्या नविननोटा व ५० हजारांचा नोटा वितरित करण्यात आल्या खरेच तांत्रीक बिघाड आहे की वारंवार नोटा घालण्याच्या भानगडीत कोण पडणार हा पवित्रा येथे घेण्यात आला. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्टेट बँकेत सर्वसामान्यांचे खाते असून खातेदारांची संख्या मोठी आहे. इतर बँकेचे एटीएम उशिरा का होईना सुरु झाले. तर दुसरीकडे स्टेट बँकेचे एटीएम सुरु होते. रात्री ८ वाजता ८ नोव्हेंबरपर्यंत हे एटीएम सुरु होते. रात्री ८ वाजता नंतर सरकारच्या निर्णयानंतर १० नोव्हेंबर रोजी नागरिकांनी एटीएमकडे धाव घेतली पंरतु त्यांना निराशा पदरी पडली.
येथे तांत्रिक बिघाड आले हे कारण पुढे करण्यात येत आहे. बँक प्रशासनाला लोकमत प्रतिनिधीने विचारले असता एटीएममध्ये तांत्रिक बिघाड आले आहे. अभियंते आल्यावर ते सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत एटीएम सुरळीत सुरु होते. नागरिकांनी उपयोग केला नाही. तर त्यात तांत्रिक बिघाड निर्माण कसे झाले हा मुख्य प्रश्न आहे. रविवारी बँकेत नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. या बँकेतून केवळ दोन हजार व पन्नास च्या नोटा वितरीत करण्यात आल्या. मागील चार दिवसापासून नोटाबंदी नंतर तुमसरातील विविध बँकेत १० कोटी जून्या नोटा जमा केल्याची माहिती आहे. सध्या प्रत्येक बँकेत चलनी नोटांचा स्टॉक आहे. परंतु येथे सुरक्षेच्या योजना तेवढ्या पुरेशा नाहीत हे विशेष आतापर्यंत १००, ५० रुपयांचा तथा दोन हजारांच्या नोटा वितरीत करणे सुरु असून मंगळवारपासून १० व ५ च्या नोटा वितरीत होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)

एटीएमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने एटीएम बंद आहे. अभियंते दुरुस्ती केल्यावर नियमित एटीएम सुरु होईल. प्रसारमाध्यमांशी बोलण्यास आम्हाला बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. वरिष्ठांचे तसे आदेश आहेत.
-एस.एस. पडवाल, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक शाखा तुमसर

Web Title: Technical failure in SBI's ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.