बयाण न घेताच दिले तहसीलदारांनी निकालपत्र

By Admin | Published: January 26, 2017 12:49 AM2017-01-26T00:49:40+5:302017-01-26T00:49:40+5:30

शेतजमिनीची आपसी वाटणी करण्याकरिता गैरअर्जदाराने तहसील कार्यालय मोहाडी येथे अर्ज सादर केला.

The tehsildars issued the affidavit without giving a statement | बयाण न घेताच दिले तहसीलदारांनी निकालपत्र

बयाण न घेताच दिले तहसीलदारांनी निकालपत्र

googlenewsNext

प्रकरण मोहाडी येथील पोटहिस्सा मोजणीचे : ‘क’ प्रत चुकीची आणि बयाणही बनावट
मोहाडी : शेतजमिनीची आपसी वाटणी करण्याकरिता गैरअर्जदाराने तहसील कार्यालय मोहाडी येथे अर्ज सादर केला. तथापि, सदर पोटहिश्याच्या मोजणी प्रकरणात तहसीलदारांनी लेखी/तोंडी यापैकी बयाण न घेता आदेशपत्र पारित केल्याची तक्रार जांब येथील मोरेश्वर उके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जांब येथील शोभा नेरकर यांनी सामूहिक गट नंबर ५४९ मधील शेतजमीन आपसी वाटणीकरिता अर्ज केल्याचे तहसीलदार मोहाडी यांच्या आदेशात उल्लेख केला आहे. मोरेश्वर उके यांनी विकत घेतलेल्या शेतजमिनीची मोजणी प्रकरण क्रमांक १४६/२०१५/पोटहिस्सा २१ डिसेंबर २०१५ रोजी केला. त्या शेतजमिनीचे मोरेश्वर उके यांचे ०.८१ हेक्टर व शोभा नेरकर यांचे १.०६ हेक्टर असे दोन पोटहिस्से पाडण्यात यायला पाहिजे होते.
परंतु शोभा नेरकर यांनी जमिनीची मोजणी करणाऱ्या व्यक्तीशी संगनमत केला. सदर जमिनीचे दोन पोटहिस्से मोजणीच्या ‘क’ प्रतमध्ये तीन पोटहिस्से पाडण्यात आले आहेत. मात्र पोटहिस्स्यामध्ये नावाचा व क्षेत्रफळाचा उल्लेख केला नाही. गटनंबरमध्ये मोरेश्वर उके व शोभा नेरकर यांचे दोनच भाग आहेत, हे उल्लेखनीय. मोजणी केलेली क प्रतच चुकीची तयार करण्यात आली आहे.
तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ११ जुलै २०१६ रोजी आपसी वाटणीचा चुकीचा निकालपत्र देऊन आदेश पारित केले आहे. या मोजणी प्रकरणात मोरेश्वर उके व त्यांची पत्नी यांना तहसील कार्यालयातून नोटीस दिले नाही. या दोघांना शेतजमिनीच्या वाटणीबाबत लेखी अथवा तोंडी बयाणही घेण्यात आले नाही. तथापि, तहसीलदार देशमुख यांनी सदर आदेशपत्रामध्ये मोरेश्वर उके व त्यांची पत्नी या दोघांचे बयाण घेतल्याचे नमूद केले आहे.
बयाण घेताना बनावट व्यक्ती उभे केल्याचा संशय आहे. त्यामुळे वाटणीपत्राचा आदेश चुकीचा आहे. त्यामुळे तहसीलदारांनी पारित केलेला आदेश रद्द करण्यात यावा, जमिनीचा सातबारा पूर्ववत करण्याची मागणी मोरेश्वर उके यांनी केली असून दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणीही मोरेश्वर उके यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

शेतजमिनीच्या आपसी वाटणी प्रकरणात झालेली चुक दुरुस्त करण्यात आली. ज्यांनी या कामात चुकी केली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.
तहसील कार्यालयात बऱ्याच चुकीच्या बाबी होतात. काही प्रकार उजेडात आले तरच भंडाफोड होतो. शेतजमिनीच्या आपसी वाटणी प्रकरणात आर्थिक व्यवहार करून तहसीलदारांनी चूक केली आहे.
- जगदीश उके, सदस्य पंचायत समिती, मोहाडी.

Web Title: The tehsildars issued the affidavit without giving a statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.