येत्या आठवड्यात तापमान घसरणार
By admin | Published: December 18, 2014 10:50 PM2014-12-18T22:50:42+5:302014-12-18T22:50:42+5:30
बुधवारी तापमान ११ डिग्रीवर गेल्याने पुन्हा थंडी प्रभाव वाढला आहे. ही वाढती तरूण वर्गासाठी गुलाबी थंडी असून थंडीचा आस्वाद घेताना तरूण वर्ग दिसून येत आहे. मात्र ही गुलाबी थंडी काही जणासाठी
भंडारा : बुधवारी तापमान ११ डिग्रीवर गेल्याने पुन्हा थंडी प्रभाव वाढला आहे. ही वाढती तरूण वर्गासाठी गुलाबी थंडी असून थंडीचा आस्वाद घेताना तरूण वर्ग दिसून येत आहे. मात्र ही गुलाबी थंडी काही जणासाठी बोचरी थंडीचे काम करीत असून त्यांना थंडीपासून बचाव करण्याची नितांत गरजेचे झाले आहे.
थंडीचा वाढता प्रभाव बालक व वृद्धासाठी जीवघेणाही ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, या बोजर्या थंडीमुळे बालक व वृद्धांच्या श्वास नलिका आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच बाल दमा, व्हिंटस डायरिया, त्वचेवर खाज, कावीळ व न्युमोनिया सारखे आजारही बळकावू शकतात. अस्तमाच्या रुग्णांना अटॅक सुद्धा येऊ शकतो.
विशेषत: वयोवृद्धांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते. त्यामुळे थंडीचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. अशा स्थितीत वृद्ध दगावू सुद्धा शकतात. विदर्भात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या आठवड्यानंतर तापमान ८ डिग्रीवर जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)