जिल्ह्यात दहा कलमी कार्यक्रमांची होणार अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:05 PM2017-08-16T23:05:30+5:302017-08-16T23:05:52+5:30

नी देशासाठी बलिदान दिले त्या शूरविरांना आठवण्याचा आजचा दिवस आहे.

Ten District programs will be implemented in the district | जिल्ह्यात दहा कलमी कार्यक्रमांची होणार अंमलबजावणी

जिल्ह्यात दहा कलमी कार्यक्रमांची होणार अंमलबजावणी

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : नगरपरिषदेचे शतकोत्तर रौप्य महोत्सव, हजारो नागरिकांच्या साक्षीने १२१ फूट उंच राष्टÑध्वजाचे ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्या शूरविरांना आठवण्याचा आजचा दिवस आहे. भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर असून स्वातंत्र्यदिनाच्या साक्षीने नागपूर सारखाच भंडारा जिल्ह्याचा विकास करण्यावर भर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या १० कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करू, असे प्रतिपादन राज्याचे उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नगरपरिषद भंडाराला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित शतकोत्तर रौप्य महोत्सव व १२१ फूट उंच स्तंभावर ध्वजारोहण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ध्वजारोहण ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.परिणय फुके, चरण वाघमारे, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., न.प. उपध्यक्ष कवलजितसिंग चढ्ढा, मुख्याधिकारी अनिल अढागळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष मो.तारिक कुरेशी आदी उपस्थित होते.
गांधी चौकात आयोजित या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ना.बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत सर्वाधिक लाभ भंडारा जिल्ह्याला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या कृषी विकास दर वाढविण्याला प्राधान्य राहणार आहे. भंडारा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी ११० कोटीची योजना तयार असून एका वर्षात ती कार्यान्वित होईल. शहरातील भूमिगत वीज जोडणीसाठी प्रयत्न केला जाणार असून भूमिगत गटार योजना करण्यावर लवकर निर्णय घेतला जाईल. नगरपरिषदेने १२१ फूट उंचीचा राष्टÑध्वज उभारून देशभक्तीची आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक व्यक्तींनी चांगल्या गुणांचा उपयोग राष्ट्र व महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नगरपरिषदेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण यावेळी ना.बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची संकल्पना नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी प्रास्ताविकातून सांगितली. संचालन प्रा. आरती देशपांडे, प्रा. स्मिता गालफाडे यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी मानले.
यावेळी शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त विविध देशभक्तीपर नृत्याचे कार्यक्रम नगरपरिषदेच्या शाळांनी सादर केले. प्रारंभी शालेय विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांची मने जिंकली. तसेच आकाशात विविध रंगाचे बलून सोडण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास भंडारा जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा विविधांगी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद उपभोगल्याचा प्रत्येक नागरिकांमध्ये जाणवत होते. नागरिकांच्या भावना आनंदाने व देशभक्तीने ओतप्रोत होऊन प्रज्वलित झाल्याचे दिसत होते.

Web Title: Ten District programs will be implemented in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.