राष्ट्रीय महामार्गावर दहा तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:38 PM2018-09-01T23:38:12+5:302018-09-01T23:38:35+5:30

राष्ट्रीय महामार्गावर बेला गावाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर टँकरमधील आॅईल रस्त्यावर सांडल्याने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुजबी ते वैनगंगा मोठा पुल अशी पाच किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला.

Ten hours of traffic jam on the national highway | राष्ट्रीय महामार्गावर दहा तास वाहतूक ठप्प

राष्ट्रीय महामार्गावर दहा तास वाहतूक ठप्प

Next
ठळक मुद्देबेलाजवळ टँकरचा अपघात : मुजबी ते वैनगंगा पुलापर्यंत वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा / जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गावर बेला गावाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर टँकरमधील आॅईल रस्त्यावर सांडल्याने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुजबी ते वैनगंगा मोठा पुल अशी पाच किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला.
नागपुरहून भंडाराच्या दिशेने ट्रक क्रमांक एपी २१टीडब्लू ९३३९ शनिवारी पहाटे जात होता. बेला येथील सेंट पिटर शाळेसमोर ब्रेकरवर ट्रकची गती कमी झाली. त्याच वेळी मागाहून भरधाव आलेला टँकर क्रमांक डब्लूबी ३३डी३६४७ ने ट्रकला मागून धडक दिली. धडक एवढी भीषण होती की टँकरच्या केबीनचा अक्षरश: चुराडा झाला.
त्यात टँकरचालक सोमनाथ रामजनमन राठोड (३४) हा जागीच ठार झाला. तर या अपघाताने टँकरची टाकी फुटली आणि आतील काळ्या रंगाचे आॅईल रस्त्यावर पसरले. रस्त्याच्या मधोमध अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्याच्या एका बाजूला काळ्या रंगाचे आॅईल वाहत होते. या आॅईलवरून जाणारे वाहने स्लीप होत होती.
त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एका बाजूने वळविण्यात आली. परिणामी वाहनाच्या पाच कि.मी. पर्यंत रांगा लागल्या. मुजबी गावापासून ते वैनगंगा पुलापर्यंत दुतर्फा शेकडो वाहने दुपारी २ वाजेपर्यंत अडकून पडली होती. वाहतूक पोलिसांच्या वाहतूक सुरळीत करताना नाकीनऊ आले होते.
या वाहनांमध्ये शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात अडकले होते. त्यांना कार्यालयात जाण्यास विलंब झाला. दुपारी २ नंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी ट्रकचालक नंदकुमार बैस यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भंडाऱ्यात गोंधळाची स्थिती
भंडारा शहरात वैनगंगेच्या पुलापर्यंत वाहनांची मोठी रांग होती यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. एका बाजूला वाहने उभी असल्याने रस्ता ओलांडणे कठीण झाले होते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह महिलांना मोठी अडचण जात होती. जिल्हा परिषद चौकात वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रीत करीत होता. परंतु वाहनचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशीच अवस्था जिल्हा कचेरीसमोर बसस्थानकाकडे जाणाºया रस्त्यावरही झाली होती.

Web Title: Ten hours of traffic jam on the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.