रेल्वे प्रवाशांना दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:47 PM2018-11-17T21:47:32+5:302018-11-17T21:47:52+5:30

रेल्वेतून विना तिकीट प्रवास करताना आढळलेल्या ३० प्रवाशांना तुमसर रोड येथील रेल्वे फलाटावर दंड ठोठावण्यात आला. रेल्वेच्या भरारी पथकाने दहा हजार रूपयांचा दंड वसूल केला. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या मार्गदर्शनात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

Ten thousand penalty for railway passengers | रेल्वे प्रवाशांना दहा हजारांचा दंड

रेल्वे प्रवाशांना दहा हजारांचा दंड

Next
ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : विनातिकीट फलाटावर येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रेल्वेतून विना तिकीट प्रवास करताना आढळलेल्या ३० प्रवाशांना तुमसर रोड येथील रेल्वे फलाटावर दंड ठोठावण्यात आला. रेल्वेच्या भरारी पथकाने दहा हजार रूपयांचा दंड वसूल केला. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या मार्गदर्शनात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
तुमसर रोड जंक्शन दक्षिण-पूर्व मध्यरेल्वेचे महत्वाचे महत्वाचे रेल्वेस्थानक आहे. येथून मोठ्या संख्येने दररोज प्रवासी ये-जा करतात. शनिवारी दुपारी २ ते ३ च्या सुमारास रेल्वेचे भरारी पथक तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दाखल झाले. फलाटावर विना तिकीट आढळलेल्या ३० जणांवर भरारी पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
यात रेल्वे रूळ पार करणे, विना तिकीट फलाटावर प्रवेश करणे या कारणावरून कारवाई करण्यात आली. रेल्वे अधिनियम कलम १५९, १६२, १४४ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई रेल्वेचे न्यायाधीश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात मंडळ सुरक्षा बल आयुक्त हेमराज पांडे, प्रभाकर दुबे, रेल्वे सुरक्षा बल प्रमुख विजय भालेकर, ओ.पी. गुर्जर, आर.के. यादव, गायकवाड, लोकेश डोरले, श्यामकुंवर यांनी केली. यावेळी रेल्वे समिती सदस्य आमल खान उपस्थित होते. दर दोन ते तीन महिन्यात रेल्वे भरारी पथक नेहमी कारवाई करीत आहे. परंतु प्रवाशात अजुनही जागृकता दिसत नाही. शनिवारी झालेल्या या कारवाईने रेल्वे स्थानकावर काही काळ खळबळ उडाली होती.

Web Title: Ten thousand penalty for railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.