स्वच्छ भारत अभियानातून १० हजार शौचालय
By admin | Published: June 21, 2016 12:31 AM2016-06-21T00:31:48+5:302016-06-21T00:31:48+5:30
सततच्या होत असलेले आजार हे अस्वच्छतेमुळे होत असतात असे तज्ज्ञांचे मत आहे.
स्वच्छतेकडून समृद्धीकडे : मोहाडी तालुक्यात राबविणार उपक्रम
विलास बन्सोड उसर्रा
सततच्या होत असलेले आजार हे अस्वच्छतेमुळे होत असतात असे तज्ज्ञांचे मत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानातून गाव पूर्णत: हागणदारीमुक्तीसाठी ठोस पाऊल पुढे उचलून मोहाडी तालुक्यात १० हजार ६९४ शौचालयाचे बांधकाम होणार आहेत.
सन २०१६ - १७ वर्षात सदर शौचालय बांधकाम होणार असून यात लाभार्थ्यांना अंदाजे १२ हजार रुपये पर्यंतचा अनुदान देण्यात येणार आहे. यात बी.पी.एल. ची अट सुद्धा नाही. यासाठी पंचायत समिती मोहाडीच्या पाणी व स्वच्छता विभागाने हागणदारीमुक्त कृती आराखडा अंतर्गत प्रत्यक्ष गावातील नागरिकांना भेटून सदर योजनेचे उद्दीष्ट, महत्व व त्याचे फायदे याविषयी माहिती देतात. तसेच गावात असलेल्या शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी यांची पाहणी करतात. मोठे शौचालय नसल्यास शौचालयासाठी प्रस्तावित करतात. गावातील तुटफूट झालेल्या नाल्या त्यावरचे झाकण यांची सुद्धा पाहणी करतात. तसेच योग्यवेळी सल्लाही देतात.
त्यांच्या या गृहभेटीतून स्टीकर लावून शौचालय बांधकाम प्रोत्साहन करण्याचे काम सध्या सुुरु आहे. यात लाल, हिरवा, पिवळा, शेंद्री या स्टीकरचा उपयोग घराला लावाताना दिसतात. यात लाल रंगाचा स्टीकर ज्या घरावर आहे त्याचा अर्थ ज्यांच्याकडे शौचालय नाही असा होतो. ज्यांच्या घावर हिरव्या रंगाचा स्टीकर आहे त्याचा अर्थ त्यांच्याकडे शौचालय आहे असा अर्थ निघतो. ज्यांच्या घरावर पिवळ्या रंगाचा स्टीकर आहे त्याचा अर्थ शौचालय घरी आहे पण वापर अर्धे करतात अर्धे वापर करत नाही. ज्या घरावर शेंद्री रंगाचा स्टीकर आहणे पण मोडकळीस आहे असा अर्थ निघतो. सध्या ग्रामीण भागात असे स्टीकर लावलेले दिसतात.
ऐन पावसाळा तोंडावर असताना व शेतकऱ्यांचे शेतीचे कामे सुरु असताना सुद्धा लाभार्थ्यांनी शौचालयासाठी खड्डे खोदकाम सुरुवात केली आहे.
स्वच्छ भारत अभियानातून शौचालय बांधकामासाठी आम्ही गृहभेटीतून यांचे महत्व समजावून सांगतो. तसेच ज्या लाभार्थ्यांना शौचालय पाहिजे असल्यास तसा तो शौचालयासाठी प्रस्तावित करतो.
- पी.व्ही. गणवीर
समन्वयक पाणी व स्वच्छता विभाग पं.स. मोहाडी.