शेतकऱ्यांचा सरी व पट्टा पद्धतीने रोवणीकडे वाढला कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:55+5:302021-08-01T04:32:55+5:30
तालुक्यातील भिलेवाडा, खरबी, चिखली, पांढराबोडी, बोरगाव, शहापूर, खमाटा येथील पट्टा पद्धत व सरी पद्धतीने लागवड केली आहे. भंडारा ...
तालुक्यातील भिलेवाडा, खरबी, चिखली, पांढराबोडी, बोरगाव, शहापूर, खमाटा येथील पट्टा पद्धत व सरी पद्धतीने लागवड केली आहे. भंडारा तालुका कृषी विभागातर्फे गावस्तरावर शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी गावस्तरावर शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कृषी सहायकांच्या मदतीने धान लागवडीच्या आधुनिक पद्धतींच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे.
बॉक्स
पट्टा पद्धतीने धान लागवड करताना धान रोपांची लावणी २० ते १५ सेंटिमीटर अंतरावर प्रत्येकी २ ते ३ रोपे सरळ लावावेत, रोपे साधारण २ ते ३ सेंटिमीटर खोलवर लावावीत. १० ओळीनंतर किंवा दोन मीटरनंतर ४० सेंटिमीटर जागा मोकळी म्हणजेच पट्टा काढावा. रोवणीपूर्वी नर्सरीतील रोपांची मुळे क्लोरोपायरीफॉस २० टक्के दहा एमएल दहा लिटर पाण्यात बुडवून नंतर रोप रोवणी करावी. पावसाचा खंड पडल्याने नर्सरीतील कालावधी वाढल्याने रोवणी करताना रोपांची शेंडा खुडून रोवणी करावी.
बॉक्स
पट्टा पद्धतीचे फायदे
पट्टा पद्धतीने रोवणी केल्याने ४० सेंटिमीटर मोकळी जागा सोडल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचते. हवा बांधणीमध्ये खेळत राहिल्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. धानाच्या मुळाची चांगल्याने वाढ झाल्याने लोंबी लांब होऊन उत्पादनात वाढ होते. पट्टा काढल्यामुळे सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील. याने तुडतुडा व इतर किडींच्या वाढीसाठी अडथळा निर्माण होतो. किडींचे व्यवस्थापन योग्य रीतीने होतो. पट्टा काढल्यामुळे बांधणीमध्ये उतरून पिकाचे निरीक्षण घेता येते, तसेच खत व औषधी फवारणी करताना पिकांमध्ये चालण्यास रस्ता म्हणून उपयोगसुद्धा होतो. त्यामुळे सरपटणारे प्राणी, विंचू यापासून शेतकऱ्यांचे संरक्षण होते.
कोट
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सरी व पट्टा पद्धतीने धानाची रोवणी करून उत्पादनात वाढ व किडीपासून पिकांचे संरक्षण करावे. पट्टा पद्धत व धान्याच्या सरी पद्धतीचा अवलंब केलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. पट्टा पद्धत व धानाच्या सरी पद्धतीचा अवलंब केलेल्या शेतकऱ्यांच्या धान उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पट्टा पद्धत व सरी पद्धतीचा अवलंब करावा.
अविनाश कोटांगले,
तालुका कृषी अधिकारी, भंडारा