विद्युत मीटरमध्ये छेडछाड, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:02 PM2019-05-27T23:02:11+5:302019-05-27T23:02:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : विद्युत मीटरला गैरहजेरीत विद्युत कर्मचाऱ्यांनी छेडछाड केल्याने विद्युत विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ...

Tension in the electric meter, action demand | विद्युत मीटरमध्ये छेडछाड, कारवाईची मागणी

विद्युत मीटरमध्ये छेडछाड, कारवाईची मागणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : विद्युत मीटरला गैरहजेरीत विद्युत कर्मचाऱ्यांनी छेडछाड केल्याने विद्युत विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रपरिषदेतून जगदीश निमजे यांनी केली आहे. असून त्या आशयाचे पत्र उपविभागीय अभियंता वीज वितरण कंपनी मोहाडी व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे.
येथील गांधी वॉर्डातील वीज ग्राहक जगदीश निमजे यांचे वीज बिल थकीत नसताना व कोणतीही पूर्वसूचना ग्राहकाला न देता विद्युत विभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी ३१ जानेवारीला वीजबिल न भरल्याचे कारण सांगून वीज जोडणी कापली, मात्र जगदीश निमजे यांच्याकडे कोणत्याही महिन्याचे वीज बिल थकीत नव्हते याची तक्रार निमजे यांनी वीज वितरण कार्यालय तसेच ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. त्यानंतर १८ फेब्रुवारीला पुन्हा दुसरे निवेदन देण्यात आल. त्या निवेदनाच्या आधारे ऊर्जा मंत्री यांनी अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी यांना एका पत्राद्वारे नमूद बाबीवर उचित कार्यवाही करावी व त्याबाबत मंत्रिमहोदयांना अवगत करावे, असे नमूद करण्यात आले होते, जगदीश निमजे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये वीज वितरण कार्यालय मोहाडी येथून जानेवारी २०१७ ते आज पर्यंत थकीत असलेल्या वीज ग्राहकांची यादी मागितलेली होती, त्यात वीज वितरण कंपनीने एकही वीज ग्राहक थकीत नसल्याची माहिती दिली, मग माझे वीज कनेक्शन कोणत्या आधारे कापण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे
यापूवीर्देखील वर्ष २००७ मध्ये जगदीश निमजे घरी नसताना विद्युत विभागाच्या भरारी पथकाने विद्युत मीटर मध्ये छेडछाड करून जगदीश निमजे यांच्यावर दंड ठोठावला होता, निमजे यांनी त्यावेळी न्यायालयात धाव घेऊन भरारी पथकावर चार्जशीट दाखल करायला भाग पाडले होते. वीज बिल थकित नसताना वीज कनेक्शन का कापण्यात आले तसेच २२ मे रोजी दुपारी तीन वाजता घरी कोणी नाही याची संधी साधून दोन कर्मचाऱ्यांनी घरी येऊन वीज मीटरमध्ये छेडछाड केली. माहिती होताच वीज मीटरमध्ये छेडछाड करण्याची तक्रार वीज वितरण कार्यालय मोहाडी येथे त्याच दिवशी करण्यात आली. त्यामुळे वीज बिल थकीत नसताना वीज जोडणी कापणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाही करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Tension in the electric meter, action demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.