कोसरा येथे सरपंच, उपसरपंच निवडणुकीवरून तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:23+5:302021-02-16T04:36:23+5:30
सरपंच आणि उपसरपंच निवडीची सभा सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात कोसरा येथे सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी पराते ...
सरपंच आणि उपसरपंच निवडीची सभा सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात कोसरा येथे सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी पराते यांच्या उपस्थितीत ही सभा सुरू होती. त्यावेळी प्रथम हात वर करून सरपंच निवडणूक घेतली. त्यात सीमा रामभाऊ नांदेकर यांच्या बाजूने ६ सदस्य होते, असे गावकऱ्यांचे आणि ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर गुप्त मतदान घेतले तेव्हा ६ सदस्यांचे मतदान सुरेश कुर्झेकर यांच्या बाजूने झाले. त्यामुळे काही सदस्यांनी आक्षेप घेतला. ग्रामपंचायतीसमोर मोठा जनसमुदाय जमा झाला. तहसीलदार नीलिमा रंगारी यांना पाचारण करण्यात आले. तेव्हा आधी झालेल्या गुप्त मतदान पद्धतीने निवड झालेले सुरेश कुर्झेकर यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आले तर उपसरपंचपदी ललीता सचिन उप्रिकर यांची निवड करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.