पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:47+5:302021-06-17T04:24:47+5:30

महिला बचतगट निर्मित कापडी पिशव्यांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा समन्वय अधिकारी माविम ...

Textile bags are a great choice for environmental conservation | पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या उत्तम पर्याय

पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या उत्तम पर्याय

Next

महिला बचतगट निर्मित कापडी पिशव्यांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा समन्वय अधिकारी माविम प्रदीप काठोळे, व्यवस्थापक नवप्रभा सीएमआरसी भंडारा रंजना खोब्रागडे, ललिता कुंभलकर क्षेत्रीय समन्वयक नवप्रभा सीएमआरसी भंडारा, अरुणा बांते व शोभा आंबूने सहयोगिनी नवप्रभा सीएमआरसी भंडारा यांची यावेळी उपस्थिती होती. नवप्रभा लोकसंचालीत साधन केंद्र भंडारा व शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र तुमसरच्या वतीने २० हजार कापडी पिशव्यांची शिलाईचे करण्यात आली आहे. या माध्यमातून महिलांना घरबसल्या १५० ते २०० रुपये दर दिवशी कमाई झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पॉलिथीन मुक्त कार्यक्रमाची प्रसार व प्रसिध्दीचा भाग म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात ७० लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून ९ लाख ५५ पिशवी शिलाईचे काम महिला बचत गटातील महिलांनी केले आहे. या करिता माविम मुख्यालयातील गौरी दोंदे कार्यक्रम व्यवस्थापक मुंबई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

कापडी पिशवीकरिता कापड व इतर साहित्य संबंधित लोकसंचलित साधन केंद्रास पुरवठा करण्यात आलेला असून लॉकडाऊन व कोरोना काळात महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचे कार्य माविमच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहेत.

सदर पिशव्याची शिलाई पूर्ण झाली असून महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील शाळेत याचे विनामूल्य वितरण केले जाणार आहे. कोविड काळात महिलांच्या हाती काम देणे व अनुभवी महिलांची निवड करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य माविम भंडाराच्या वतीने शक्ती लोकसंचलित साधन केंद्र, तुमसर व्यवस्थापक मंदा साकोरे व नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र, भंडारा व्यवस्थापक रंजना खोब्रागडे व त्यांची टीम करीत आहेत.

कोट

टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांची आर्थिक परवड होऊ नये, या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार तर मिळाला आहेच सोबतच पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे. प्लॅस्टिक पिशव्यांना या कापडी पिशव्या योग्य पर्याय ठरतील.

- प्रदीप काठोळे, समन्वयक, माविम, भंडारा

Web Title: Textile bags are a great choice for environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.