जिल्ह्यात कीटकजन्य आजाराचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:37 AM2021-09-03T04:37:09+5:302021-09-03T04:37:09+5:30
भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता ...
भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्यास पाेषक वातावरण निर्माण झाले आहे. ताप, सर्दी, खाेकला आदींचे रुग्ण गावागावांत दिसत आहेत. काेराेनाच्या भीतीमुळे अनेक जण उपचारासाठी रुग्णालयात जात नाहीत. औषधी दुकानातून गाेळ्या आणून स्वत:च उपचार करताना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. ताप जास्त झाल्यानंतर मग रुग्णालयात धाव घेतली जाते.
भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ५५२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. त्यात डेंग्यूचे ३६ रुग्ण आढळून आले आहेत, तर मलेरियाचे ७ रुग्ण आढळलेत.
बाॅक्स
कीटकजन्य आजारासाठी पाेषक वातावरण
जिल्ह्यात सध्या वातावरणातील बदलाने कीटकजन्य आजारासाठी पाेषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गावागावांत रुग्ण आढळून येत आहेत. साकाेली तालुक्यासह इतर तालुक्यांतही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूसाठी कारणीभूत असलेल्या इडीस इजिप्ती या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात हाेते. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आसपास आणि घरात पाणी साचले असेल, तर ते रिकामे करावे, कूलर फुलदाण्या यामध्ये असलेले पाणी वारंवार बदलावे, आठ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी ठेवू नये, मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन साकाेली तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. आर.टी. नंदेश्वर यांनी केले आहे.