ठाणा ग्रामपंचायतीचे हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:57+5:302021-05-15T04:33:57+5:30

जवाहरनगर : ठाणा ग्रामपंचायतींतर्गत महात्मा फुले प्रभाग क्रमांक पाचमधील दोन बोअरवेल नादुरुस्त आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ...

Thane Gram Panchayat neglects hand pump repairs | ठाणा ग्रामपंचायतीचे हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष

ठाणा ग्रामपंचायतीचे हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Next

जवाहरनगर : ठाणा ग्रामपंचायतींतर्गत महात्मा फुले प्रभाग क्रमांक पाचमधील दोन बोअरवेल नादुरुस्त आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे. ग्रामपंचायत ठाणा पेट्रोल पंप येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या आसपास आहे. येथे एकूण पाच प्रभाग आहेत. गावात एकूण बावीस बोर हातपंप आहेत. कडक उन्हाळ्यात काही विहिरी व हातपंप परिसरातील खासगी विहिरी व हातपंपांची पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे कोरडे पडलेले आहेत. प्रभाग क्रमांक पाचमधील मुबलक पाणी असलेल्या बोअरवेल व कॅनरा बँकस्थित असलेल्या दोन बोअरवेल दुरुस्त करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रभागातील महिला शुद्ध पाण्यासाठी भटकंती करत आहेत. संबंधित वरिष्ठ विभागाने या ज्वलंत प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.

Web Title: Thane Gram Panchayat neglects hand pump repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.