पावसाळ्यात तुडुंब भरलेला बावनथडी प्रकल्प गाठताेय तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 05:00 AM2022-05-14T05:00:00+5:302022-05-14T05:00:46+5:30
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू आहे. या प्रकल्पात सध्या जिवंत साठा १३.९३ दलघमी असून, केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. धान पिकासाठी हाेणारा पाण्याचा विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे प्रकल्पातील पाणी कमी हाेत आहे. याचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या सिंचनावर हाेणार आहे.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे. उन्हाळी धानाकरिता १५ मेपर्यंत पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तसेच चांदपूर जलाशयासाठी १० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आता केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. ही संकटाची चाहूल म्हणावी लागेल.
यंदा प्रकल्प भरला हाेता पूर्ण क्षमतेने
- बावनथडी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीचा उगम मध्य प्रदेशात भरपूर पाऊस पडल्याने सिंचन व पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच भीषण तापमानामुळे बाष्पीभवन हाेऊन जलसाठा कमी हाेत आहे.
पहिल्यांदाच टेलपर्यंत पाेहाेचले पाणी
- बावनथडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी ४२०० हेक्टर नियाेजन करण्यात आले हाेते. यावर्षी प्रथमच टेलपर्यंत पाणी पाेहाेचले. चिखला या गावांना उन्हाळी हंगामासाठी पाणी देण्यात आले.
बावनथडी प्रकल्पातून १५ मेपर्यंत उन्हाळी धानाचा विसर्ग सुरू राहणार आहे. सध्या धरणात जलसाठा कमी असल्याने खरीप हंगामातील धान पऱ्ह्यांना पाणी मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा जपूण वापर केल्यास सिंचनाला याेग्य पाणी मिळेल.
- आर. आर. बडाेले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प