क्रूरतेचा कळस! तलवारीने सपासप २६ वार करत शिर केले धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 08:21 PM2022-06-04T20:21:49+5:302022-06-04T20:38:54+5:30

Bhandara News चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तलवारीने एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ वार करून चक्क शिर धडावेगळे केले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना तुमसर येथे एका हाॅटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

The culmination of cruelty! He struck his head 26 times with his sword | क्रूरतेचा कळस! तलवारीने सपासप २६ वार करत शिर केले धडावेगळे

क्रूरतेचा कळस! तलवारीने सपासप २६ वार करत शिर केले धडावेगळे

Next
ठळक मुद्दे चुलत बहिणीला पळविल्याचा रागातून घडली घटना

भंडारा : चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तलवारीने एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ वार करून चक्क शिर धडावेगळे केले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना तुमसर येथे एका हाॅटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पाहणाऱ्यांनाही अंगावर शहारे येतात. साेबतच क्रूरता गाठणाऱ्या तरुणांनाबद्दल घृणाही निर्माण हाेते.

सचिन गजानन मस्के (वय ३४) रा. शिवाजीनगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे, तर कुलदीप मनोहर लोखंडे (२९), केतन दिलीप मदारकर (२८) आणि रंजीत सहदेव गभणे (३२) रा. तिघेही रा. शिवाजीनगर तुमसर यांना अटक करण्यात आली. सचिन आणि तीनही आरोपी यांच्यात मैत्री होती. एकमेकांचे मित्र असल्याने घरी येणे-जाणे होते. त्यातच यातील एका आरोपीच्या बहिणीसोबत सचिनचे सूत जुळले. अचानक २७ मे रोजी सचिन त्या तरुणीला घेऊन पसार झाला. पोलिसांनी तरुणीसह सचिनला १ जून रोजी नागपूर बसस्थानकावरून ताब्यात घेतले. तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले, तर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावून सचिनला घरी पाठविले.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सचिनसह तीन आरोपी देव्हाडी रोडवरील हाॅटेलमध्ये गेले. तेथे जेवण आटोपून बाहेर पडल्यानंतर काळजाचा थरकाप उडेल अशा पद्धतीने सचिनचा निर्घृण खून केला. दुचाकीवर बसून असलेल्या सचिनवर प्रथम चाकूने मानेवर वार केला. खाली कोसळल्यावर कुलदीपने तलवारीने सपासप वार केले. तीन वारातच सचिनने प्राण सोडला. मात्र, निर्दयी आणि क्रूरतेने सचिन मृत्यूमुखी पडल्यानंतरही त्याच्यावर सपासप वार करून शिर धडापासून वेगळे केले.

तिघांनाही अटक

सचिन मस्के याचा खून केल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीने घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, ही घटना प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी रात्री शोध घेऊन कुलदीप लोखंडे, केतन मदारकर, रंजीत गभणे या तिघांना अटक केली. शनिवारी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली.

रेल्वेचे आरक्षण रद्द केले नसते तर वाचले असते प्राण

प्रेमप्रकरणात अपयश आल्याने सचिन दु:खी झाला होता. तुमसर सोडून जायचा त्याने निर्धार केला होता. मुंबईला जाण्यासाठी त्याने ३  जून रोजीचे रेल्वे आरक्षणही केले होते. मात्र, अचानक २ जूनला सकाळी सचिनने आरक्षण रद्द केले. आरक्षण रद्द केले नसते आणि मुंबईत गेला असता तर प्राण वाचले असते.

Web Title: The culmination of cruelty! He struck his head 26 times with his sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.