अपघातातील जखमींना पालकमंत्री कदम यांनी आपल्या गाडीतून आणलं, मिळाली तातडीची वैद्यकीय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 04:19 PM2022-05-01T16:19:47+5:302022-05-01T16:20:57+5:30

भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी नागपूरवरून भंडाऱ्याकडे येत होते. राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यातील मौद्याजवळ त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबविला अन्...

The Guardian Minister Kadam brought the injured from his vehicle and got immediate medical help | अपघातातील जखमींना पालकमंत्री कदम यांनी आपल्या गाडीतून आणलं, मिळाली तातडीची वैद्यकीय मदत

अपघातातील जखमींना पालकमंत्री कदम यांनी आपल्या गाडीतून आणलं, मिळाली तातडीची वैद्यकीय मदत

Next

भंडारा :  महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यासाठी भंडाऱ्याकडे येताना, रस्त्यात दिसलेल्या अपघातातील जखमींना पालकमंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांनी, आपल्या शासकीय वाहनात बसवून आणले आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. यामुळे पालकमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव अपघातग्रस्तांसह नागरिकांना रविवारी आला.

भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी नागपूरवरून भंडाऱ्याकडे येत होते. राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यातील मौद्याजवळ त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबविला. चौकशी केली असता अपघातात जखमी महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याचे त्यांना दिसले. रक्तस्त्राव सुरू होता. अशा स्थितीत पालकमंत्री कदम यांनी संवेदनशीलतेचा परिचय देत अपघातग्रस्तांना  तातडीने आपल्या शासकीय वाहनात बसवले आणि भंडारा विश्रामगृहावर पोहचले. तत्पूर्वी त्यांनी या अपघाताची सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाझ फारूकी यांना दिली होती. त्यावरुन त्यांनी जखमींसाठी रुग्णवाहिका विश्रामगृहावर पाठवली. वेळ न दवडता जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जखमी दमयंती येले (४५) रा. मुंडीपार ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या सहृदयतेने अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाल्याने नातेवाईकांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
 

Web Title: The Guardian Minister Kadam brought the injured from his vehicle and got immediate medical help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.