सावकाराने बळकावलेली जमीन मिळेल परत; शेतकऱ्यांनो, तक्रार करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 01:24 PM2024-07-15T13:24:15+5:302024-07-15T13:25:56+5:30
Bhandara : वार्षिक ३६ टक्के व्याज आकारणी तक्रारीवर उपनिबंधक करणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क :
भंडारा : जिल्ह्यात सातत्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बेजार आहे. पिकांचे नुकसान, नापिकी आणि बँकेचे कर्ज, मुलांचे विवाह, मुलांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च अशा संकटांतील शेतकरी सावकाराचा दरवाजा ठोठावतो; पण समोरच्याची गरज पाहून सावकार तीन ते पाच टक्क्यांनी पैसे देतो. सहा महिने किंवा एक वर्षाला चक्रवाढ व्याज आकारतो. याप्रसंगी तारण ठेवलेली जमीनही बळकावतो.
सावकाराने बळकावलेली जमीन शेतकऱ्यांना परत प्राप्त करता येते. यासाठी त्यांना जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करावी लागते. सावकाराचे कर्ज शेतातील पिकातून कमी होईल आणि आपली जमीन पुन्हा परत मिळेल, या आशेने शेतकरी रक्ताचे पाणी करून पिकाला जपतो. आता अवैधरीत्या अधिक दराने कर्ज देणाऱ्या बचत गटांवरही कारवाई केली जाणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार अर्ज करावा लागतो. गोपनीय पद्धतीने अर्ज करायचा असतो. अर्ज केल्याच्या तारखेपासून १५ वर्षे मागे संबंधित जमिनीची रजिस्ट्री झाली असल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत शेतकऱ्याला न्याय मिळतो.
जिल्ह्यात नोंदणी केलेले २७६ सावकार
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोंदणी केलेले २७६ सावकार जिल्ह्यात आहेत. हे सावकार गरजूंना कर्ज उपलब्ध करून देतात. यामुळे त्यांना मदत मिळते; परंतु दिलेले कर्ज वसूल करताना अनेकजण तगादा लावतात, बळजबरी करतात.
मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज घेता येत नाही
सावकारीचा परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रात सावकारी करता येत नाही. तसेच कर्जदाराकडून सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारायचे असून, चक्रवाढ पद्धत लागू नाही. मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज सावकाराला घेता येत नाही. एखादी व्यक्ती विनापरवाना सावकारी करीत असल्यास जिल्हा निबंधक किवा सहायक निबंधक कधीही वॉरंटशिवाय प्रवेश करून चौकशी करू शकतात.
सावकार किती व्याज घेऊ शकतात?
■ सहकार विभागाने १६ सप्टेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सावकारी कर्जावरील व्याजदर निश्चित केलेला आहे.
■ सावकाराने शेतकऱ्याला दिलेल्या तारण कर्जाला प्रतिवर्ष ९ टक्के आणि विनातारण कर्जाला प्रतिवर्ष १२ टक्के व्याजदर ठरलेला आहे.
■ शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज देताना तारण कर्जाला प्रतिवर्ष १५ टक्के आणि विनातारण कर्जाला १८ टक्के व्याजदर आकारण्याची अट कायद्यात आहे.
...तर बचत गटांवर होणार कारवाई
जिल्ह्यात सावकारांनी ठरवून दिलेल्या व्याजारपेक्षा अधिक व्याज शेतकऱ्यांकडून घेतल्यास करवाई केली जाते. जिल्ह्यात काही बचत गटांकडून अवैध सावकारी होत आहे