वैनगंगेला प्रचंड पूर: पोकलेन मशीन गेले वाहून; अंभोरा पुलाला धोका!

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 11, 2024 09:53 AM2024-09-11T09:53:44+5:302024-09-11T09:55:33+5:30

वैनगंगेला प्रचंड पूर आल्याने या पुराच्या प्रवाहात सकाळी पोकलेन मशीन वाहून गेले.

The Poklen machine was carried away in the Wainganga River Danger to Ambhora Bridge | वैनगंगेला प्रचंड पूर: पोकलेन मशीन गेले वाहून; अंभोरा पुलाला धोका!

वैनगंगेला प्रचंड पूर: पोकलेन मशीन गेले वाहून; अंभोरा पुलाला धोका!

गोपालकृष्ण मांडवकर/लोकमत न्यूज नेटवर्क|
भंडारा : पुलावर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पोकलेन मशीन वाहून गेले आहे. विशेष म्हणजे हाय टेन्शन लाईनच्या तारा या मशीनमुळे तुटत असल्याने परिसरातील गावांना आणि नदीपात्राचा प्रवाह धोकादायक झाला आहे.

भंडारा जवळील अंभोरा येथे बायपास पुलाचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी पोकलेन मशीनसह अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. वैनगंगेला प्रचंड पूर आल्याने या पुराच्या प्रवाहात सकाळी पोकलेन मशीन वाहून गेले. गोसेखुर्दच्या पात्राकडे हा प्रवाह जात असून अंभोरा येथील नवनिर्माण पुलाला या पोकलेन मशीनमुळे धोका निर्माण झाला आहे.

प्रशासन युद्धस्तरावर कामाला लागले आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने दखल घेऊन हाय टेन्शन लाईनचा  वीज  प्रवाह बंद केला आहे.

Web Title: The Poklen machine was carried away in the Wainganga River Danger to Ambhora Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.