सौर कृषी पंप योजनेतून संपणार भारनियमनाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:33 PM2024-09-23T12:33:28+5:302024-09-23T12:35:00+5:30

शेतकऱ्यांनो, अर्ज केला का? : 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना'

The problem of load regulation will end with solar agriculture pump scheme | सौर कृषी पंप योजनेतून संपणार भारनियमनाची समस्या

The problem of load regulation will end with solar agriculture pump scheme

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' सुरू करण्यात आली आहे. यामुळे भारनियमनाची समस्या संपून, संपूर्ण आठ तास नियमित पाणी मिळण्यास मदत होईल. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील. लाभार्थी निवडीचे निकष महावितरणने निश्चित केले आहेत. पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांस ३ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरवरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषिपंपाची मागणी केल्यास ती ग्राह्य धरली जाईल. 


वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहीर व नदी, आदी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी हे पंप वापरता येणार नाही. 


अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ ज्यांना मिळाला नाही, ते शेतकरीदेखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. 


काय आहे 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना'? 
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंच- नाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. राज्यात सौर कृषी पंप कार्यान्वित होणार आहेत.


पाच वर्षांची दुरुस्ती हमी
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे. सर्वसाधारण गटाच्याशेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच दिला जाईल. अनुसूचित जाती-जमातींच्या शेत- कऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के भरावा लागेल. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार- कडून अनुदान म्हणून दिली जाईल. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचा पंप योजनेंतर्गत दिला जाईल. सौर पंपाची पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्ससह संच दिला जाणार आहे. सौर ऊर्जेवर पंप चालणार असल्याने वीज बिल येत नाही, त्यामुळे भारनियमनाची चिंता शेतकऱ्यांना नाही. 


येथे करावा लागेल अर्ज 

  • मागेल त्याला कृषी पंप योजनेसाठी शेतकरी महावित- रणच्या mahadiscom.in/solar या वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. 
  • सध्याच्या कृषी पंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी, आदी तपशील देणे अनिवार्य आहे. सातबारा उतारा प्रत, आधार कार्ड, एससी, एसटी लाभार्थीसाठी जात प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.

Web Title: The problem of load regulation will end with solar agriculture pump scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.