शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा लवकरच होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:31 IST2025-03-04T14:29:48+5:302025-03-04T14:31:12+5:30
Bhandara : शिक्षक सहकार संघटनेच्या मागणीला यश

The seventh phase of inter-district transfer of teachers will start soon
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : २०१७ मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदलीने देशातच एक नवीन आदर्श निर्माण केला गेला. या ऑनलाइन बदल्यांमुळे भ्रष्टाचारावरही अकुंश लावण्यात यश आले.
बदली प्रक्रियामुळे शिक्षक समाधानी असल्याचेही दिसून आले. आताही शिक्षक सहकार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा ७ वा टप्पा होणार सुरू आहे. दरम्यान, मागील वर्षापासून प्रशासन बदल्या करण्यास दिरंगाई करीत असल्याचे दिसून आले. यासाठी शिक्षक सहकार संघटनेने पाठपुरावा सुरू केला. बदल्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नव्हती.
आचारसंहितेचा फटका
लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने ती राबविली गेली नाही. ही प्रलंबित बदली प्रक्रिया शिक्षक भरतीपूर्वी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अखेरची सेवाज्येष्ठता लावून तत्काळ ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनाकडून करण्यात आली.
जोडले १२ आमदारांचे पत्र
शिक्षकांची आंतरजिल्हा बदली व्हावी यासाठी निवेदनासोबत आ. परिणय फुके, विनोद अग्रवालसह १२ आमदारांचे पत्र जोडण्यात आले होते, अशी अशी माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद तिरपुडे यांनी 'लोकमत'ला दिली.
यावेळी सरचिटणीस फनिलकुमार पटले, सुरेंद्र ठाकरे, समीर शेख, उमेश गोंडाणे, सुधाकर संग्रामे, संदीप गोन्नाडे, वीरेंद्रसेन देशभ्रतार, देव झलके, सुभाष कठाणे, शाहीद खान, किरणकुमार चव्हाण, सचिन मेश्राम, महेश चव्हाण, दिनेश रामटेके, दशरथ वाट, प्रवीण खांडेकर, हेमंतकुमार टेम्भरे, आशिष येळेकर, शैलेश खेताडे, करुणा मेश्राम, श्वेता भुजाडे, अमृता सेलोकर, ज्योती चव्हाण, अंकितकुमार मिश्रा, प्रतीककुमार मांडवकर, राजपाल गजभिये, चित्रांगी बैरागी, पंकज ठाकरे, भिमलेश वारके यांच्यासह शिक्षक सहकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सोबत होते.
"२०१७ पासून जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा ऑनलाईन बदली व्हावी यासाठी शिक्षक सहकार संघटना सतत प्रयत्नशील आहे. यावर्षी शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी अनुकूलता दर्शविली."
- अरविंद तिरपुडे, शिक्षक सहकार संघटना, जिल्हाध्यक्ष, भंडारा.