महावितरणचा शॉक; महिन्याच्या वीजबिलात किमान 65 रुपये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 05:00 AM2022-07-16T05:00:00+5:302022-07-16T05:00:20+5:30
गत महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका भंडारा शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या ग्राहकांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, महावितरणने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. नुकतेच वीज दरवाढीचे आदेश काढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महावितरणने दोन महिन्यांपूर्वी ग्राहकांना सुरक्षा ठेव रकमेच्या नावाखाली वाढीव वीजबिले आकारल्यानंतर, आता पुन्हा वीजनिर्मितीसाठी कोळसा व इंधनाचे दर वाढल्याचे कारण देत, इंधन समायोजन आकारामध्ये वाढ केली आहे. गत महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका भंडारा शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या ग्राहकांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, महावितरणने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. नुकतेच वीज दरवाढीचे आदेश काढले आहेत. मात्र, याबाबत अद्याप महावितरणच्या परिमंडळ स्तरावर कुठलेही आदेश प्राप्त झाले नाही.
१००युनिट पर्यंत सर्वाधिक ग्राहकांचा वापर
जिल्ह्यात बहुतांश ग्राहकांचा १०० युनिटपर्यंत विजेचा वापर आहे. त्यांना ६५ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसणार आहे. तर ५०१ पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे.
भारनियमनाने परेशान
सध्या कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. शहरी भागात भारनियमन नसले, तरी ग्रामीण भागात मात्र भारनियमन सुरु आहे.
२.७१ लाख घरगुती वीजग्राहक
भंडारा जिल्ह्यात दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहक आहेत. महावितरणने दरवाढ केल्याने याचा फटका या ग्राहकांना बसणार आहे. कृषी ग्राहकांनाही मोठा फटका बसणार आहे.
पाच महिन्यांसाठी दरवाढ
वीजनिर्मितीसाठी कोळसा व इंधनाचे दर वाढल्याचे कारण देत, इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका घरगुती ग्राहकांना बसणार आहे.
इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करून लागू केलेली वीज दरवाढ म्हणजे ग्राहकांची लूट आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जीवनावश्यक वस्तूही महागल्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यात पुन्हा महावितरणने दरवाढीचा शाॅक दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहे.
- महेश रणदिवे, ग्राहक.