तिसरी लाट ओसरली; आतापर्यंत 7745 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 05:00 AM2022-02-24T05:00:00+5:302022-02-24T05:00:40+5:30
कोरोनाच्या तिन्ही लाटेत मिळून आजपर्यंत ६७ हजार ८५६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी ६६ हजार ६६७ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. सध्या दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ०.६३ इतका असून एकूण पाॅझिटिव्हिटी दर ११.९० इतका आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ इतके आहे. बुधवारी १२७४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत ७ हजार ७४५ व्यक्ती बाधित झाल्या असून आठ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४७ रुग्ण सक्रिय असून बाधित झालेल्यांपैकी ७ हजार ६९० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
कोरोनाच्या तिन्ही लाटेत मिळून आजपर्यंत ६७ हजार ८५६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी ६६ हजार ६६७ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. सध्या दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ०.६३ इतका असून एकूण पाॅझिटिव्हिटी दर ११.९० इतका आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ इतके आहे. बुधवारी १२७४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. यात भंडारा, मोहाडी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर लाखनी तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.
सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत तालुकानिहाय आकडेवारीत भंडारा १३, मोहाडी ३, तुमसर व पवनी प्रत्येकी २, लाखनी १५, साकोली ९, तर लाखांदूर तालुक्यातील तीन बाधितांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ११३४ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिसऱ्या लाटेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत मृत्यू दर ०१.६८ टक्के इतका आहे.
आतापर्यंत ५ लाख ७० हजार ४०३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ५२१, मोहाडी १००, तुमसर १२९, पवनी ११३, लाखनी ९९, साकोली १०९, तर लाखांदूर तालुक्यातील ७१ जणांचा समावेश आहे.
तिसऱ्या लाटेत भंडारा व मोहाडी तालुक्यातील २, पवनी तालुक्यातील १, तर साकोली तालुक्यातील तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेतील मृत्यू दर ०.१० टक्के इतका आहे.
१४ हजार ४८१ व्यक्तींनी घेतला प्रिकाॅशन डोस
- जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती सुयोग्य स्थितीत आहे. आतापर्यंत जिल्हाभरात दोन्ही डोस मिळून १७ लाख ९० हजार ५७३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ५४ हजार ४४९ इतकी असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख २१ हजार ६४३ इतकी आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेदरम्यान शासनाने सुरू केलेला प्रिकाॅशन डोस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या १४ हजार ४८१ इतकी झाली आहे. प्रभावी जनजागृतीमुळे जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी उत्तम आहे.