चोरीचा छडा लावला अवघ्या बारा तासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:59+5:302021-09-22T04:38:59+5:30

अडयाळ : शनिवार रात्रीच्या दरम्यान अडयाळ येथील अश्फाक गुलाबखा पठाण यांच्या घरात चोरी झाली होती. ती रविवारी उघडकीस येऊन ...

The theft was detected in just twelve hours | चोरीचा छडा लावला अवघ्या बारा तासात

चोरीचा छडा लावला अवघ्या बारा तासात

Next

अडयाळ : शनिवार रात्रीच्या दरम्यान अडयाळ येथील अश्फाक गुलाबखा पठाण यांच्या घरात चोरी झाली होती. ती रविवारी उघडकीस येऊन त्यात रोख रक्कम आणि दागिने मिळून एकूण ६१ हजारांची चोरी झाली.या घटनेची नोंद १९ सप्टेंबरला होताच अडयाळ पोलीस तत्काळ कामाला लागले. तपासात जे निष्कर्ष निघाले त्या अंदाजाने आरोपीला अवघ्या बारा तासात अटक करण्यात आली.

अडयाळ येथील भाटपुरी वॉर्ड क्रमांक मधील अश्फाक गुलाबखा पठाण हे व घरचे सर्व मिळून बाहेर गावी गेले असता आरोपी इर्शाद जलील पठाण हा कुऱ्हाडी ता. गोरेगाव (जिल्हा गोंदिया) येथील रहिवासी असून याला येथून अडयाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन कलम ३८०,४५४,४५७ नुसार अटक करण्यात आली. त्याच्याकडून ६१ हजार पैकी ४५ हजारांचे साहित्य आरोपीकडून हस्तगत करण्यात आले. यासाठी ठाणेदार सुशांत पाटील तथा पोलीस कर्मचारी, सहकारी यांचे सहकार्य लाभले.

गावातील एक प्रकरण सध्या चिघळत चालला आहे तो म्हणजे बैल पोळ्याच्या संध्याकाळी अडयाळ भिवखिडकी मार्गावर ज्या दुचाकी वाहनाचे अपघात झाले होते. त्यात आनंद वालदे हे गंभीर जखमी झाले होते. उपचाराअंती त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचे अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळावरून अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे त्या वाहनाचा शोध मात्र अडयाळ पोलिसांना अजूनही लागलेला नाही. घटनास्थळाहून वाहन कुणी नेले असावे, खरंच चोरून नेला की पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला असावा ? अशी विविध प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.

Web Title: The theft was detected in just twelve hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.