तर जिल्हा कचेरीत धान फेकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:23 AM2020-01-11T01:23:58+5:302020-01-11T01:24:53+5:30

साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर धान उघड्यावर आहे. शासनाने खरेदी केलेला धान न उललल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावरील धान खरेदी बंद आहे. त्यामुळे शेकडो क्विंटल धान आधारभूत केंद्राबाहेर उघड्यावर आहे.

Then throw the paddy in the district office | तर जिल्हा कचेरीत धान फेकू

तर जिल्हा कचेरीत धान फेकू

Next
ठळक मुद्देपरिणय फुकेंचा इशारा : शेकडो क्विंटल धान उघड्यावर, अनेक केंद्रांवर खरेदी ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शासनाच्या दुर्लक्षित धारणाने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान विक्रीच्या प्रतीक्षेत आधारभूत केंद्राबाहेर उघड्यावर आहेत. पावसात ओले होवून या धानाला कोंब फुटले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. येत्या सात दिवसात जिल्ह्यातील संपूर्ण धान खरेदी केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात धान फेकू असा इशारा आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे.
साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर धान उघड्यावर आहे. शासनाने खरेदी केलेला धान न उललल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावरील धान खरेदी बंद आहे. त्यामुळे शेकडो क्विंटल धान आधारभूत केंद्राबाहेर उघड्यावर आहे. अवकाळी पावसात तब्बल चार ते पाचदा हा धान भिजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यास महाविकास आघाडी असर्थ ठरल्याचे दिसत असल्याचा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
आता हा धान येत्या सात दिवसात खरेदी केला नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देवून धान फेकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नैसर्गीक आपत्तीचा सामना करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. परंतु शासनाच्या धोरणामुळे शेतकºयांना मोठा फटका बसत आहे. खरेदी केलेल्या धानाचे चुकारे मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

व्यापाऱ्यांशी साटेलोटे
जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागते. उलट व्यापाऱ्यांचा धान तातडीने खरेदी करण्यात येतो. हाच प्रकार शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत आहे. परंतु यावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. याप्रकरणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.

वाढीव दर व बोनस मिळाला नाही
शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकला. जिल्ह्यात सात लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमतीप्रमाणे १८१५ रूपये प्रती क्विंटल शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु शासनाने जाहीर केलेले वाढीव दर आणि बोनसचा अद्यापही पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असे शेतकरी सांगत आहे.

साकोलीचे धान खरेदी केंद्र बंद
धान उत्पादनात अग्रेसर असलेल्या साकोलीसह तालुक्यातील अनेक धान केंद्र बंद आहे. शेतकरी आपला धान येथे विक्रीसाठी आणत आहे. परंतु धानाची खरेदी होत नाही. त्यामुळे उघड्यावरच धान ठेवावा लागत आहे. दुसरीकडे अवकाळी पावसाने धानाला कोंब फुटले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान शासनाने भरून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. साकोलीत नव्हे तर जिल्ह्यातील अनेक केंद्र बंद आहेत. परंतु याबाबत शासकीय स्तरावरून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महिनाभरापासून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: Then throw the paddy in the district office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.