सोंड्याटोलाचे दार बंद असल्याने नदीपात्रात मुबलक जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:16+5:30

तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नद्या वाहतात. बावनथडी नदीवर बावनथडी धरण बांधण्यात आले. तर सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावांना संजीवनी ठरलेला सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून चांदपूर तलावात पाणीसाठा करण्यात येतो. त्यामुळे उन्हाळी पीक धोक्यात येतात.

There is abundant water storage in the river basin since the gate of Sondatola is closed | सोंड्याटोलाचे दार बंद असल्याने नदीपात्रात मुबलक जलसाठा

सोंड्याटोलाचे दार बंद असल्याने नदीपात्रात मुबलक जलसाठा

Next
ठळक मुद्देचांदपूर जलाशयात उपसा केव्हा होणार : उपसा सिंचन प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील सोंड्या टोला उपसा सिंचन योजनेचे द्वार बंद असल्याने सध्या वैनगंगा नदीपात्रात मुबलक जलसाठा आहे. घानोड गावाजवळ नदी पात्र दुथडी भरली आहे. चांदपूर जलाशयात पाणी उपसा करण्याची गरज आहे. तांत्रिक कारणामुळे पाणी उपसा बंद आहे.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नद्या वाहतात. बावनथडी नदीवर बावनथडी धरण बांधण्यात आले. तर सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावांना संजीवनी ठरलेला सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून चांदपूर तलावात पाणीसाठा करण्यात येतो. त्यामुळे उन्हाळी पीक धोक्यात येतात. सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पातील वारंवार वीज पुरवठा खंडीत होणाचा प्रकार मागील काही वर्षापासून सुरु आहे. शासन दरवर्षी वीज बिलाचा भरणा करते. परंतु कायमस्वरुपी उपाययोजना येथे अद्याप करण्यात आली नाही. सध्या नदी दुथडी भरली आहे. घानोड गावापासून बॅक वॉटर पाहायला मिळते.

प्रशासनाचे दुर्लक्ष
नदीपात्रात मुबलक जलसाठा उपलब्ध असून उन्हाळ्यात पाणी साठा उपलब्ध राहावा, याकरिता चांदपूर जलाशयात तात्काळ पाणी उपसा करण्याची गरज आहे. सोमवारपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्यात आमदार राजू कारेमोरे यांनी सदर प्रश्न मांडून ध्यानाकर्षण करण्याची गरज आहे.उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली असून पाण्याचा योग्य उपयोग करण्याकरिता प्रशासनाने येथे दखल घेण्याची गरज आहे.

Web Title: There is abundant water storage in the river basin since the gate of Sondatola is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.