तालुक्यात बंधारे अनेक, शेतीला सिंचन मात्र शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:00 AM2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:29+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव, रेंगेपार, उशीखेडा, पांढरी, डव्वा, कोसमतोंडी, सौंदड, राका, घटेगाव, कोकणा, कनेरी-राम,चिखली, कोहमारा, डुग्गीपार, कोदामेडी, तिडका, केसलवाडा, मंदीटोला,कोसमघाट, सावंगी, फुलेनगर, घाटबोरी, गिरोला, मालीजुंगा, जांभळी, चिरचाडी या गावाशेजारी वाहणाऱ्या नाल्यावर वनविभाग व लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारे बंधारे तयार करण्यात आले पण त्याच्यापासून कसलेच सिंचन होत नाही.

There are many dams in the taluka, but zero irrigation for agriculture | तालुक्यात बंधारे अनेक, शेतीला सिंचन मात्र शून्य

तालुक्यात बंधारे अनेक, शेतीला सिंचन मात्र शून्य

googlenewsNext
ठळक मुद्देदेखभाल दुरूस्तीचा अभाव : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय तसेच भूजल पातळीत वाढ करुन पाणी टंचाईच्या समस्येवर मात करता यावे यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. सुरूवातीला याचा फायदा देखील शेतकऱ्यांना झाला. पण याकडे जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या बंधाऱ्यांतून कसेल सिंचन होत नसून ते केवळ नाममात्र ठरत आहेत.
मागील १० वर्षापूर्वी बाम्हणी-खडकी गावाजवळ वाहणाऱ्या नाल्यावर लाखो रुपये खर्चून बंधारा तयार करण्यात आला. त्यानंतर दोन वर्ष बंधाऱ्यांजवळ ११ ते १२ फूट पाणी उन्हाळ्याच्या दिवसात साचून राहत होते. पण पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्यांच्या एका बाजूला खिंड पडल्याने या बंधाऱ्यांजवळ आता थोडेही पाणी राहत नाही. आलेले पाणी सरळ वाहून जाते.
या बंधाऱ्यांमुळे बाम्हणी-खडकी परिसरातील दल्ली, जिराटोला, खडकी, डोंगरगाव, डुग्गीपार, देवपायली या गावांना चांगला फायदा होऊ शकतो. परिसरात रबीत धान व भाजीपालासह अन्य पीक घेता आली असती.
मात्र बंधाऱ्यांत पाणी राहत नसल्याने आता विंधन विहिरींच्या माध्यमातून भुगर्भातील जलसाठ्याचा उपसा करुन शेती केली जात आहेत. दरवर्षी सिंचनासाठी भूृर्गभातील लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. पण पाणी जमिनीत मुरविण्यासाठी कोणताच विभाग प्रयत्न करित नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील उमरझरी नाल्यावर, घाटबोरी, कोहमारा, कनेरी-राम, देवपायली, पांढरी, रेंगेपार, वडेगाव, केसलवाडा गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर १-१ किमी. अंतरावर कोल्हापुरी पक्के बंधारे बांधल्यास तालुका हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही हे विशेष. पण जमिनीतील पाण्याचा उपसा होत असल्यामुळे आता सडक-अर्जुनी, वडेगाव, परसोडी, कोहमारा, जांभळी आदी गावात पाण्याची समस्या निर्माण होत असून विंधन विहिरींनाही पाणी येत नाही.
त्यात शिक्षक कॉलनी, करतुरीनगर, पंचायत समिती परिसरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. नाल्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधणे हा पर्याय पाण्यासाठी उत्तम आहे. पण या बाबीचा कुणीही विचार करीत नाही.

हे बंधारे केवळ नावालाच
सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव, रेंगेपार, उशीखेडा, पांढरी, डव्वा, कोसमतोंडी, सौंदड, राका, घटेगाव, कोकणा, कनेरी-राम,चिखली, कोहमारा, डुग्गीपार, कोदामेडी, तिडका, केसलवाडा, मंदीटोला,कोसमघाट, सावंगी, फुलेनगर, घाटबोरी, गिरोला, मालीजुंगा, जांभळी, चिरचाडी या गावाशेजारी वाहणाऱ्या नाल्यावर वनविभाग व लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारे बंधारे तयार करण्यात आले पण त्याच्यापासून कसलेच सिंचन होत नाही.

Web Title: There are many dams in the taluka, but zero irrigation for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.