शरीराने नाही तर विचारांनी अपंगत्व येते

By admin | Published: October 28, 2016 12:37 AM2016-10-28T00:37:11+5:302016-10-28T00:37:11+5:30

समाजातील कमकुवत घटक, गरीब, अपंग विद्यार्थ्यांना बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण बदलत चाललेला आहे.

There is a disability in the mind, but not by the body | शरीराने नाही तर विचारांनी अपंगत्व येते

शरीराने नाही तर विचारांनी अपंगत्व येते

Next

शुभांगी खोब्रागडे : दत्तक सदस्य नोंदणी अभियान, दिवाळीनिमित्त अविस्मरणीय भेट
भंडारा : समाजातील कमकुवत घटक, गरीब, अपंग विद्यार्थ्यांना बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण बदलत चाललेला आहे. आता अपंग विद्यार्थीपण सामान्य विद्यार्थ्यांसोबत व सामान्य विद्यार्थ्यांसारखेच शिक्षण घेत आहेत. सरकारी असो की खासगी सुविधांचा वापर करून हे विद्यार्थी जीवनाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. त्याकरिता त्यांना एक संधी हवी असते आणि हीच संधी देण्याकरिता प्रत्येकाने आपले सामाजिक ऋण फेडावे. या विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थी समजून मदत नाही संधीची अपेक्षा आहे. कारण हे अपंगत्व शरीराने नाही तर विचाराने येत असते असे प्रतिपादन लोकमत बालविकास मंचतर्फे आयोजित येथील बेला स्थित जनचेतना कर्णबधीर व मतीमंद निवासी विद्यालय येथील दत्तक सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत कार्यक्रमात शुभांगी लोकेश खोब्रागडे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक संजय घोडके, प्रमुख अतिथी शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे,प्रभारी मुख्याध्यापक रत्नाकर शहारे उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक शहारे यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा अशा विविध विषयांवर माहिती देऊन बालविकास मंचच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे विद्यार्थी आवर्जून सहभागी होतील अशी हमी दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडके यांनी २२ वर्षे जुनी आठवणीला उजाळा देताना सांगितले की, आमच्या संस्थेची प्रथम बातमी लोकमत वृत्तपत्राने प्राकशित केली. तेव्हापासून आजपर्यंत लोकमतचे सहकार्य असेच मिळत आहे. बालविकास मंच या नावातच बालकांच्या सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट्ये या अपंग विद्यार्थ्यांना सदस्य करून साध्य होणार आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दत्तक सदस्य नोंदणीत सहभागी विद्यार्थ्यांना शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे व मान्यवरांच्या हस्ते आयकार्ड व गिफ्ट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पालक प्रतिनिधीने दिवाळीत मिळालेल्या या अभूतपूर्ण भेटीमुळे आमच्या पाल्यांची दिवाळी आनंदाने व उत्साहाने साजरी होईल असे मनोगत व्यक्त केले. लोकेश खोब्रागडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकवृंदांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आम्हाला मोलाचे समाजकार्य करण्याची संधी दिली. याबद्दल आभार प्रकट केले. कार्यक्रमाचे संचालन अमरीश शनिवारे, प्रास्ताविक जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे, नियोजन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार व आभार रत्नाकर शहारे यांनी मानले. कार्यक्रमात शिक्षकवृंद रिता पाटील, सुमेध माने, सुरेश दंडारे, विनायक पाथोडे, भीमराव रामटेके, उद्धव कारेमोरे, निलेश धर्मे, प्रमिला शिंदे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: There is a disability in the mind, but not by the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.