खुवेशचा अपघाती मृत्यू नसून खूनच

By admin | Published: January 4, 2016 12:36 AM2016-01-04T00:36:30+5:302016-01-04T00:36:30+5:30

भंडारा-वरठी राज्य महामार्गावर दोन वर्षापूर्वी ६ डिसेंबर २०१३ ला खुवेश रामटेके याचा अपघाती मृत्यू झाला होता.

There is no accidental death, but murderer | खुवेशचा अपघाती मृत्यू नसून खूनच

खुवेशचा अपघाती मृत्यू नसून खूनच

Next

पालकाचा आरोप : मोबाईल मिळाले नक्षलग्रस्त भागात, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
वरठी : भंडारा-वरठी राज्य महामार्गावर दोन वर्षापूर्वी ६ डिसेंबर २०१३ ला खुवेश रामटेके याचा अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघातस्थळाहून त्याचे दोन्ही मोबाईल चोरीला गेले होते. याबाबत दाखल तक्रारीनुसार भंडारा पोलीसानी मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. पण सदर मोबाईल नक्षलग्रस्त चिचगढ भागात आढळल्याने तपास थांबविला होता. अखेर खुवेशच्या पालकांनी चिचगड पोलिसांच्या मदतीने मोबाईल हस्तगत केला. पण भंडारा जिल्ह्यातील मोबाईल नक्षलग्रस्त भागात आढळल्यामुळे खुवेशचा अपघाती मृत्यू नसून खून असल्याची तक्रार पालक मिलिंद रामटेके यांनी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे केली आहे.
खुवेश घरून जाताना दोन मोबाईल सोबत घेऊन गेला होता. अपघात झाल्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी त्याचे पाकीट घरच्यांना परत आणून दिले होते. पण त्याच्या जवळ असलेले दोन्ही मोबाईल चोरीला गेले होते. यापैकी एका खासगी कंपनीचा मोबाईल बिल नुसार १० डिसेंबर २०१३ ला पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
अनेक वेळा तक्रार देऊनही मोबाईलचा पत्ता न लागल्यामुळे भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास नुसार सदर मोबाईल नक्षलग्रस्त चिचगड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गणुटोला येथे आढळला.
सदर क्षेत्र नक्षलग्रस्त असल्यामुळे तपास थांबवून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल हस्तगत करण्यात असमर्थता दर्शविली.
यानुसार खुवेशचे वडील मिलिंद रामटेके यांनी पत्नी बिंदू रामटेके, सामाजिक कार्यकर्ता त्रिवेणी वासनिक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे व पोलीस मित्र येल्लजवार यांच्यासह चिचगड पोलीस ठाणे गाठले.
चिचगड पोलिसांच्या मदतीने नीलेश शाहु व भुवेश अहराज यांचा शोध घेऊन मोबाईल हस्तगत करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी सदर मोबाईल १५० किमी अंतरावर कसा आला याबाबत विणारणा केल्यावर त्यानी उडवाउडवीची उत्तरे दीली. मोबाईलमध्ये ९९२१७४१६६२ या क्रमांकाचे सीम व त्यात असलेले मेमरी कार्ड मिळाले नाही. चिचगड पोलिसांनी मोबाईल हस्तगत केले. पण अपघात संदर्भात पुरेशी चौकशी केली नाही. दोन वर्षात भंडारा पोलिसांना मोबाईल हस्तगत करता आला नाही. उलट नक्षलग्रस्त भाग आहे म्हणून तपास थांबविला. मोबाईल ज्यांच्याकडे होता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. यामुळे खुवेशचा मृत्यू घात-पात असून त्याचा खून करण्यात आला असावा संशय बळावला आहे.
खुवेश याचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खून करण्यात आला असावा असे भंडारा पोलीस अधीक्षक यांना तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात नव्याने तपास करून योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वडील मिलिंद रामटेके यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: There is no accidental death, but murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.