‘त्या’ पीडितेच्या न्यायाबाबत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:19 PM2017-09-08T23:19:59+5:302017-09-08T23:20:28+5:30

लाखांदूर येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपींना अटक केली.

There is no doubt about the judgment of the victim | ‘त्या’ पीडितेच्या न्यायाबाबत दुजाभाव

‘त्या’ पीडितेच्या न्यायाबाबत दुजाभाव

Next
ठळक मुद्देशंकरराव लिंगे : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखांदूर येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपींना अटक केली. मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक असलेले सहकार्य न मिळाल्याने पीडितेचे कुटुंब आजही भयभीत अवस्थेत असल्याचा आरोप अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केला आहे.
पीडित मुलीला प्रशासनाने दीड लाखांची मदत दिली आहे. तर अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून दोन लाखांची मदत दिल्याची माहिती यावेळी लिंगे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांची महिन्याभरात सुटका झाली. यामुळेच याप्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप लिंगे यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय माळी महासंघाने गुरूवारला पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित मुलीला न्याय द्यावा, पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियाला २५ लाखांची सानुग्रह मदत शासनाने द्यावी, कारवाईत अडथडा निर्माण करणाºया पोलीस कर्मचाºयांवर कारवाई करावी, चित्रफित सोशल मिडियामध्ये प्रसारित करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, जि.प. सदस्य रेखा भुसारी, प्रकाश अडाळकर, अनिल किरणापुरे, बी.एम. मदनकर, आशिष नंदुरकर, संजय सावरकर, साधु नागरिकर, शिला कांबळे, डॉ. राजेश नंदुरकर, गुलशन पात्रिकर, महादेव पात्रिकर, प्रिया शहारे, सोनिया डोंगरे आदी उपस्थित होते.
‘त्या’ चित्रफितीपासून पोलीस अनभिज्ञ
पीडित मुलीची चित्रफित सोशल मीडियाच्या एका साईटवर प्रसारित केली आहे. याप्रकरणी शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली असता, त्याची कल्पनाच त्यांना नसल्याचे सांगितले. त्यानंतर साईटचे नाव सांगितल्यानंतरही त्यांच्याकडे ती उघडली नाही. त्यांच्यामुळे त्यांच्या संगणक प्रणालीवर शंकरराव लिंगे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Web Title: There is no doubt about the judgment of the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.