कामात खोटारडेपणा चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:32 PM2018-01-20T22:32:31+5:302018-01-20T22:32:55+5:30
प्रशासकीय कामात कामचुकारपणा करू नका, सर्वसामान्यांच्या कामाला न्याय द्या, अन्यथा कुणाचीही गय करणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला.
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : प्रशासकीय कामात कामचुकारपणा करू नका, सर्वसामान्यांच्या कामाला न्याय द्या, अन्यथा कुणाचीही गय करणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला.
लाखांदूर येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष, सभापती, उपसभापती यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सभापती मंगला बगमारे, उपसभापती शिवाजी देशकर, गटविकास अधिकारी डी. एम.देवरे, विस्तार अधिकारी जी.बी.करंजेकर, मेळे यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा सदुपयोग करण्याची ग्वाही देऊन डोंगरे म्हणाले, विकासाच्या बाबतीत पक्षभेद विसरून मी सदैव तत्पर आहे. शेतकºयांप्रती गंभीर असून शासनाच्या कृषीविषयक योजना प्रत्येक तालुक्यात पोहोचून त्याचा लाभ झाला पाहिजे यासाठी प्राधान्यक्रम देणार आहे. कर्मचाºयांनी सर्वसामान्यांची कामे तातडीने करावी, गरिबांचे कामे करण्यातच खरा आनंद असतो त्यामुळे ग्रामसेवकांनी गावात विकासाच्या दिशेने कामे करावी, प्रशासकीय कामात कुणी खोटारडेपणा केला तर त्याला सोडणार नाही. असा ईशाराही त्यांनी दिला. प्रास्ताविक विस्तार अधिकारी अंबादे यांनी तर आभारप्रदर्शन वानखेडे यांनी केले.