जिगाव प्रकल्प : सुक्ष्म सिंचन प्रणाली व सौर ऊर्जेसाठी वेगळी मान्यता घेण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:00 PM2020-03-04T18:00:52+5:302020-03-04T18:01:07+5:30
२५० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणीवापर संस्था कार्यान्वीत राहणार असून प्रती तीन हेक्टरपर्यंत २० मीटर उंचीचे (प्रेशराईज्ड) पाणी दरदिवशी दीड तास याप्रमाणे दिले जाणार आहे.
बुलडाणा: जिगाव प्रकल्पाचे पाणी सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे देण्यासोबतच त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार असून यासाठी लागणाºया निधीला वेगळी मान्यता घेण्याची गरज राहलेली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली. नऊ सप्टेंबर २०१९ च्या जिगावच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेमध्येच या बाबींचा समावेश आहे.
ँ प्रकल्पातंर्गत एक लाख १६ हजार ५७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यानुषंगाने सूक्ष्म सिंचन प्रणाली ही स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वीत करण्यात येणा आहे. दरम्यान, उपसा सिंचन योजनेतंर्गत साधारणत: २५० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणीवापर संस्था कार्यान्वीत राहणार असून प्रती तीन हेक्टरपर्यंत २० मीटर उंचीचे (प्रेशराईज्ड) पाणी दरदिवशी दीड तास याप्रमाणे दिले जाणार आहे. त्यानुषंगाने झोननिहाय पाणी वाटपास प्राधान्य देण्यात येणार आहे.
सुक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर केल्याने जवळपास २० टक्क्यांपर्यंत उत्पादकता वाढविण्यास मदत मिळणार असल्याचे वाल्मीच्या अभ्यासानंतर स्पष्ट झाले आहे. वीजेचा एकंदरीत होणारा वापर पाहता ५० ते ६० कोटी रुपयापर्यंत वार्षिक येणारा खर्च पाहता ही योजना आर्थिकदृ्ष्टया सक्षम व शेतकरी हित डोळ््यासमोर ठेवून कार्यान्वीत करण्यासाठी सौर ऊर्जेचा यात वापर करण्यात येणार आहे. सौर ऊर्जा ही ग्रीडच्या माध्यमातून देण्यात येणार असून ती शाश्वत स्वरुपात कशी राहील याला यातंर्गत प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिगाव प्रकल्पातंर्गतच्या ४५ हजार हेक्टरवर सर्व्हेक्षण करण्यात आले आहे त्याचे सकारात्मक परिणामही समोर आलेले आहेत.