मोहगाव हद्दीत वृक्षाची लागवड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:16 PM2017-10-12T23:16:54+5:302017-10-12T23:17:11+5:30
सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत रनेरा ते मोहगाव खदान गावापर्यंत राज्य मार्गाचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन आखण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत रनेरा ते मोहगाव खदान गावापर्यंत राज्य मार्गाचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन आखण्यात आले आहे. प्रत्यक्षात हरदोली आणि मोहगाव खदान गावाचे दृष्टीत वृक्ष लागवड करण्यात आली नाही. यामुळे निधी खर्चाचे आलबेल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
सिहोरा परिसरात असणाºया रनेरा, हरदोली गावाचे हद्दीत जंगलाचे क्षेत्र आहे. याच गावातून तुमसर-बपेरा राज्य मार्ग आहे. या राज्य मार्गाचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन सामाजिक वनिकरण विभाग मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आले आहे. वृक्षाचे लागवड खर्चाना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून वृक्ष लागवड, वृक्षाचे संवर्धन तथा अन्य कार्यासाठी १३ लाख ५५ हजार ५३९ रूपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक वनिकरण विभागाने रनेरा ते जंगलपर्यंत दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या शिवाय जंगलात जनावरे शिरणार नाही. याकरिता झाडाचे फांद्या तोडून सुरक्षा भिंत तयार करण्यात आली आहे. १० दिवसात या सुरक्षा भिंतीची नासधुस झाली आहे. प्रत्यक्षात दोन कि़मी. अंतर पर्यंत वृक्ष लागवडीचे नियोजन असताना अर्धा कि़मी. पर्यंत वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दीड कि.मी. पर्यंत मोहगाव खदान आणि हरदोली गावाचे हद्दीत वृक्षाची लागवड करण्यात आली नसल्याने आलबेल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्याचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन असताना उर्वरित जागेवर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली नाही.
ज्या जागेत वृक्षाची लागवड करण्यात आली आहे, अशा वृक्षांना सुरक्षा कवच नाही. यामुळे लागवड करण्यात आलेले वृक्ष जिवंत राहणार किंवा नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. अर्धा कि़मी. अंतर पर्यंत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे संगोपन व संवर्धन करण्यात येत नाही. लाखो रूपये खर्चाचे नियोजन असताना सामाजिक वनिकरण विभागाचे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहितीसाठी हरदोलीचे सहायक वन परिक्षेत्र कार्यालयात माहितीसाठी संपर्क साधण्यात आले असता त्यांनी तुमसर कार्यालयाचे कार्यक्षेत्रात असल्याची माहिती सांगण्यात आली.