परिश्रमाशिवाय यश नाही
By admin | Published: June 28, 2016 12:39 AM2016-06-28T00:39:37+5:302016-06-28T00:39:37+5:30
घरी अठराविश्वे दारिद्र्य, विड्या बांधून शिक्षण घेतले. आज माझी महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
सुखदेवे यांचे प्रतिपादन : गुणवंतांचा सत्कार सोहळा
भंडारा: घरी अठराविश्वे दारिद्र्य, विड्या बांधून शिक्षण घेतले. आज माझी महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यामुळे परिश्रमाशिवाय जीवनात यश नाही, असे प्रतिपादन डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांनी केले.
भंडारा जिल्ह्यातील डॉ. सुखदेवे यांची रिझर्व बँँक आॅफ इंडियाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ही भंडारा जिल्हावासीयांसाठी व समाजासाठी भूषणासह बाब आहे. त्या प्रीत्यर्थ दी भंडारा बॅकवर्ड क्लास को आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने वैशालीनगर येथील बुद्धविहारात त्यांचा सत्कार करण्यात आला . त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून अॅड. अनिल गोवारदीपे, अॅड. प्रकाश ढोळे, सामाजिक कार्यकर्ते वामनराव मेश्राम, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, डी. एफ. कोचे उपस्थित होते.
याप्रसंगी सत्कारमूर्ती डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांना स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत प्राण्यिश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवीदिल्ली स्थित आलेपूर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण भूमिच्या यशस्वी आंदोलनात सहभागी झालेल्या भंडारा येथील २० भीम सैनिकांचा सत्कार करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. अॅड. प्रकाश ढोळे यांनी काही संस्थांना 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या गं्रथाचे वाटप केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव मन्साराम दहीवले यांनी केले. संचालन अॅड. वैभव आंगले यांनी केले. आभार पी. के. ठवरे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीचे संगणक धूळ खात
लाखनी: ग्रामपंचायतीच्या कामकाजात गतीमानता यावी, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय पेपरलेस व्हावे, यासाठी प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना संगणक संच दिले. संगणक आॅपरेटरची नियुक्तीही करण्यात आली. परंतु बहुतांश ग्रामपंचायतीचे संगणक धूळ खात पडले आहे. त्यामुळे ई-ग्रामपंचायतीचा फज्जा उडाल्याचे लाखनी तालुक्यात दिसत आहे.