जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचा बळी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:32+5:302021-06-02T04:26:32+5:30

भंडारा : एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यूचे तांडव अनुभवल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याला दिलासा मिळाला. मंगळवारी जिल्ह्यात कुठेही कोरोनाने ...

There were no Corona victims in the district Tuesday | जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचा बळी नाही

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचा बळी नाही

Next

भंडारा : एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यूचे तांडव अनुभवल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याला दिलासा मिळाला. मंगळवारी जिल्ह्यात कुठेही कोरोनाने मृत्यू झाला नाही. मात्र, ९० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १०५४ जणांचा बळी घेतला. यातील निम्म्यापेक्षा अधिक मृत्यू एकट्या एप्रिल महिन्यात झाले होेते. कोरोना संसर्गाचा उद्रेक आणि मृत्यूचे तांडव यामुळे नागरिक भयभीत झाले होते. मात्र, मे महिन्यात नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, दररोज कुणाचा ना कुणाचा कोरोनाने मृत्यू होत होता. महिनाभरात एका दिवसाचा अपवाद वगळता दररोज मृत्यू होत होते. मात्र, जून महिन्याची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.

मंगळवारी १५८४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात साकोली तालुक्यात ६४, मोहाडी ११, भंडारा, तुमसर प्रत्येकी २, लाखनी ९ आणि पवनी व लाखांदूर येथे प्रत्येकी एक, असे ९० रुग्ण आढळून आले. भंडारा तालुक्यात आतापर्यंत २४६०, मोहाडी ४३२९, तुमसर ७०८३, पवनी ५९८८, लाखनी ६४९४, साकोली ७४६२ आणि लाखांदूर तालुक्यात २८९९ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ९३८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५८ हजार ८८५ पाॅझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी ५६ हजार ८१५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. ९८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बाॅक्स

सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात

जिल्ह्यात आतापर्यंत १०५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ४९१, मोहाडी ९४, तुमसर ११९, पवनी १०४, लाखनी ९५, साकोली १०२ आणि लाखांदूर तालुक्यातील ४९ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ९८६ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा २७६, मोहाडी ६६, तुमसर ९०, पवनी ४८, लाखनी ६०, साकोली ३९१ आणि लाखांदूर तालुक्यात ५५ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: There were no Corona victims in the district Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.