साकोलीच्या तलावाचे होणार सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:24+5:302021-02-14T04:33:24+5:30
साकोली : राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या ९० एकर क्षेत्रात असलेल्या तलावाच्या सौंदर्यीकरणाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून, या तलावांच्या ...
साकोली : राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या ९० एकर क्षेत्रात असलेल्या तलावाच्या सौंदर्यीकरणाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून, या तलावांच्या सौंदर्यीकरणासाठी दोन करोड ४७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केली असून, त्या संदर्भात निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे साकोली शहराला एक नवीन रूप येणार आहे.
साकोली येथील हा तलाव मामा तलावाच्या नावाने ओळखला जात असून, सद्यस्थितीला हा तलाव शेतीसाठी सिंचनाच्या कामी पडत आहे. मात्र, या तलावाच्या सौंदर्यीकरनानंतर या तलावाचे खोलीकरण करण्यात येणार असून, या तलावाची पाळी साठवण क्षमताही वाढणार आहे. त्यामुळे सिंचनाची क्षमताही नक्कीच वाढेल. या तलावामुळे व सौंदर्यीकरणामुळे साकोलीला नक्कीच नवे रूप येणार आहे. सौंदर्यीकरणात बगीचे, संगीतमय पाण्याचे फवारे, अशा विविध सोईसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, तसेच पटाच्या मैदानावर बाजार, मटन मार्केट तयार होणार असून, साकोलीच्या सुंदरतेत भर पडणार आहे.