रासायनिक खताची टंचाई भासणार!

By admin | Published: June 9, 2017 12:34 AM2017-06-09T00:34:24+5:302017-06-09T00:34:24+5:30

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली.

There will be a shortage of chemical fertilizers! | रासायनिक खताची टंचाई भासणार!

रासायनिक खताची टंचाई भासणार!

Next

मागणीपेक्षा मंजुरी अधिक: अधिकारी म्हणतात, मुबलक पुरवठा होणार
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. कृषी आयुक्तालयाकडून एक लाख तीन हजार ९०० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मंजूर करण्यात आली. दि.३० मे अखेर २९ हजार ४४७ मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा शिल्लक आहे. दरवर्षीे शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होत नसल्यामुळे यावर्षी मागणीपेक्षा पुरवठा अधिक असूनही शेतकऱ्यांना वेळेवर रायायनिक खतांचा पुरवठा होईल काय, याविषयी संभ्रमावस्था आहे.
मागील पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात रायायनिक खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई यावर्षी जाणवू नये, यासाठी जिल्हा परिषदेने खतांची मागणी वाढवून मागितली. कृषी आयुक्तालयाकडून १ लाख ३ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर करण्यात आले आहे. शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ९८ हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. यात १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत १९४४ मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पुरवठा करण्यात आलेला व मागील वर्षाचा शिल्लकसाठा मिळून २९४४७ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. सद्यस्थितीत या खताची ७५ मेट्रीक टन विक्री झालेली आहे.
सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेची युरिया खताची मागणी ४७ हजार ३५५ मे.टन होती. यात ४६ हजार ९०० मे.टन मंजूर करण्यात आले. तर ३१ मार्चपर्यंत ६६९३.९० मे.टन युरिया शिल्लक होता. ३१ मेपर्यंत ४०४ मे.टन पुरवठा करण्यात आला. या खताची ५० मेट्रीक टन विक्री झालेली आहे. एकूण युरियाचा ७०४७.९ मे.टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी खताची मागणी ४ हजार ९७१ मे.टन असून १४ हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. पूर्वीचा शिल्लकसाठा ५०४.३५ मे.टन होता. त्यात पुरवठा करण्यात आलेल्या ७४ मे. टनाची भर पडून सध्या ५७८.४ मे. टन साठा शिल्लक आहे. एमओपी खताची मागणी ६२३ मे. टन असून चार हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. ११४.९२ मे. टन मागील शिल्लक असून १४८.९ मे. टन पुरवठा करण्यात आला. सध्या १४८.९ मे. टन एमओपी शिल्लक आहे. एसएसपी खताची मागणी ९ हजार ९९९ मे. टनाची होती. १९ हजार १०० मे. टन मंजूर झाले. शिल्लक साठा १० हजार ८२० मे.टन असून पुरवठा ९७ मे. टन झाला. असा एकूण शिल्लकसाठा १० हजार ९१७ मे.टन आहे.
याशिवाय १५.१५.१५, २०.२०.०, २०.२०.१३, २४.२४.०, १२.३२.१६, १६.१६.१६ या खतांचीही खरिपासाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रासायनिक खतांच्या मागणीला मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. मात्र या खतांचा मागील वर्षाचा काही साठा शिल्लक असल्याचे जि. प. कृषी विभागाने सांगितले आहे.

आता खत खरेदीसाठी लागणार "आधार"
आता शेतकयांना खत खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खतासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानातील गैरप्रकार कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. शेतकऱ्यांना खते हवी असल्यास कृषी सेवा केंद्रात जाताना बरोबर आधारकार्ड न्यावे लागणार आहे. याठिकाणी असलेल्या मशीनवर आधार नंबरची नोंदणी झाल्यानंतर हाताचा अंगठा मशीनवर द्यावा लागणार आहे. त्यामुळे तेथेच बिल तयार केले जाऊन शेतकऱ्यांना खत मिळणार आहे. म्हणजेच खते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष हातात पडल्यानंतरच कंपन्यांना अनुदान मिळणार आहे.

Web Title: There will be a shortage of chemical fertilizers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.