३९७ वृक्षांची होणार कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:31+5:30

पुढील टप्पा मिटेवानी-चिचोली रस्त्यावरील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लक्ष ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. सदर रस्त्यावर ६० ते ७५ वर्षे जुनी डेरेदार झाडे आहेत. वृक्षतोडीमुळे याचा पर्यावरणावर परिणाम होईल, यात शंका नाही.

There will be a slaughter of 397 trees | ३९७ वृक्षांची होणार कत्तल

३९७ वृक्षांची होणार कत्तल

Next
ठळक मुद्देचिचोली-मिटेवानी रस्ता बांधकाम : संरक्षित वनातील झाडांना मात्र जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : राज्यमार्ग रुंदीकरण देव्हाडी-तुमसर रस्त्यावरील डेरेदार ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. आता चिचोली-मिटेवानी दरम्यान तीन किमी अंतरातील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव कंत्राटदाराने वनविभागाकडे सादर केला आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लाख ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. या झाडांचे मुल्यमापन नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून करण्यात आले आहे. चिचोली ते गोबरवाही दरम्यान सान किमी परिसरात संरक्षीत जंगलातील झाडे कापण्याची परवानगी नाही.
गोबरवाही - देव्हाडी दरम्यान राज्य महामार्ग बांधकाम प्रस्तावित असून कामाला सुरुवात झाली आहे. प्रथम टप्प्यात तुमसर शहरातून जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे सुरु आहे. तुमसर- देव्हाडी ५ किमीच्या रस्त्यावरील ९६७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली.
सदर पुढील टप्पा मिटेवानी-चिचोली रस्त्यावरील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लक्ष ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. सदर रस्त्यावर ६० ते ७५ वर्षे जुनी डेरेदार झाडे आहेत. वृक्षतोडीमुळे याचा पर्यावरणावर परिणाम होईल, यात शंका नाही.

पुर्नरोपण प्रक्रियाही अपूर्ण
रामटेक- तुमसर - गोंदिया हा राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधकाम सुरु आहे. दरम्यान रस्ता शेजारील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. येथेही पुर्नरोपण प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला नाही. रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या शेजारी दुप्पट वृक्षारापेण करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

चिचोली- मिटेवानीदरम्यान रस्ता शेजारील झाडांचे मुल्यमापन करण्यात आले आहे. २ लाख ६ हजार २३९ रुपये इतके मुल्यमापन करण्यात आले. झाडे कापण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही.
- नितेश धनविजय,
वनपरिक्षेत्र अधिकारी, नाकाडोंगरी

वनविभागाने केले मूल्यमापन
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाने ३९७ डेरेदार वृक्षांचे मुल्यमापन करुन २ लाख नऊ हजार २३९ इतके मुल्य आकारले आहे. संबंधित कंत्राटदाराने शासनाकडे सदर रकमेचा भरणा केला आहे, परंतु वनविभागाने झाडे कापण्याची परवानगी दिली नाही अशी माहिती आहे.
रस्ता बांधकाम येथे एकेरीच राहणार
चिचोली ते गोबरवाही दरम्यान सातपुडा पर्वत रांगा असून सात किमी परिसर घनदाट जंगलाने वेढला आहे. हे संपूर्ण जंगल संरक्षित वनात आहे. येथून आंतरराज्यीय मार्ग जातो, परंतु रस्ता बांधकाम येथे एकेरीच राहणार आहे. त्यामुळे झाडे कापली जाणार नाही. उर्वरित रस्ता हा दुहेरी राहणार आहे.
८० ते १०० वर्षे जुनी झाडे
देव्हाडी-तुमसर रस्त्यावरील ९६७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. ही झाडे ८० ते १०० वर्षे जुनी होती. त्यामुळे काही झाडे पुर्नरोपन करुन ती वाचविता आली असती. काही झाडांना पुर्नरोपनच्या माध्यमातून जीवनदान मिळाले असते, परंतु इच्छाशक्त्ीचा अभाव येथे दिसून आले. वृक्षारोपणाच्या केवळ बाता करण्यात धन्यवाद मानणारा वनविभागाने येथे दखल घेतली नाही. रस्ता बांधकामाकरिता सर्रास झाडांचा बळी घेतला जात आहे.

Web Title: There will be a slaughter of 397 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.