ते आले, त्यांनी पाहिले अन् सर्वकाही जिंकले

By admin | Published: March 13, 2016 12:36 AM2016-03-13T00:36:58+5:302016-03-13T00:36:58+5:30

'अरे दिवानों मुझे पहचानो, कहा से आया मैं हूँ कौन' या गाण्याने सभागृहात प्रवेश करताच सखींची एकच गर्दी झाली.

They came, they saw and won everything | ते आले, त्यांनी पाहिले अन् सर्वकाही जिंकले

ते आले, त्यांनी पाहिले अन् सर्वकाही जिंकले

Next

ज्युनिअर अमिताभने केली धमाल
अभिनय, नृत्य, काव्यवाचनाने कार्यक्रमाला बहार
भंडारा : 'अरे दिवानों मुझे पहचानो, कहा से आया मैं हूँ कौन' या गाण्याने सभागृहात प्रवेश करताच सखींची एकच गर्दी झाली. भंडारा शहरातील वॉर्ड संयोजिकांनी गुलाबाच्या पाकळ्यांच्या वर्षावात ज्युनिअर अमिताभ यांचे स्वागत केले.
भंडारा येथे लोकमत सखी मंचच्या वतीने महिला दिनानिमित्त शुक्रवारी शहरातील मुस्लिम लायब्ररी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटक ज्युनिअर अमिताभ, नागपूर येथील सखी संयोजिका नेहा जोशी, मनिषा रक्षिये, कार्यालय प्रमुख मोहन धवड, जिल्हा प्रतिनिधी नंदु परसावार यांच्या हस्ते करण्यात आले. सखी वॉर्ड प्रतिनिधी वैशाली झाडे यांनी 'इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो है' या सुमधुर गिताने पाहुण्यांचे स्वागत केले.
ज्युनिअर अमिताभ यांनी कार्यक्रमाला प्रारंभ करताच सखींनी एकच जल्लोष केला. मग काय? त्यांचे अभिनय, गायन, नृत्य व काव्य हुबेहुब अमिताभ बच्चन यांच्यासारखेच. त्यात भर म्हणजे सखींना प्रत्यक्षात त्यांच्यासोबत स्पर्धा खेळण्याची संधी सखींनी केली. सखींच्या आग्रहखातर अग्निपथ, दिवार, हम, शराबी, बागबान, शहंशाह, जंजीर, मोहबते या चित्रपटातील प्रसिद्ध गीत व संवाद त्यांनी यावेळी सादर केले.
'कजरा रे कजरा रे, रंग बरसे, खैके पान बनारस वाला, कभी कभी, पार्टी तो बनती है' आदी गाण्यांवर सखींनी त्यांच्यासोबत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. जणू वाटले ते आले. त्यांनी पाहिले, अन् सर्वकाही जिंकले. यावेळी नेहा जोशी यांनी सखी, युवती व महिलांना सखी नोंदणीकरिता आवाहन केले. जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी वार्षिक कार्यक्रमा अहवाल दिला. त्यांनी लोकमत सखी मंच ब्रँड अ‍ॅम्बेसिडर चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच सखींच्या भेटीला येणार आहे. बिग इव्हेंट म्हणून निराली 'कुकरी शो' खास सदस्यांसाठी नि:शुल्क आयोजित करण्यात येईल. संचालन कार्यक्रम संयोजक ललित घाटबांधे यांनी केले. आभार मंगला डहाके यांनी मानले.
कार्यक्रमासाठी मुस्लिम लायब्रेरी भंडारा व मैत्री फुड पार्इंटचे संचालक मनोज रक्षिये व संचालिका मनिषा रक्षिये यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात कल्पना डांगरे, सुहासिनी अल्लडवार, दिपा काकडे, राखी सूर, सुधा बत्रा, मनिषा इंगळे, संगिता भुजाडे, अर्चना गुर्वे, अंजली वंजारी, कांता बांते, अंजु पिपरेवार, विजयालक्ष्मी वैद्य, संगिता सुखानी, शिल्पा न्यायखोर, चित्रा झुरमुरे, सुष्मा घुबडे, प्रणिता पाटील, श्रद्धा डोंगरे, किरण भावसार, मंगला क्षिरसागर, शालिनी सुर्यवंशी, वैशाली झाडे, श्वेता वाडीभस्मे, शरयू टाकळकर, अल्का खराबे, मधुरा मदनकर, मंदा पडोळे, संध्या रामटेके, वंदना दंडारे, ज्योती मलोडे, दिपा टेंभुर्णे, सविता डोरले, स्रेहा वरकडे, शशांक रामप्रसाद, विनोद भगत, सुधाकर गोन्नाडे, माधव तिघरे, दिगांबर बारापात्रे व सुरज यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: They came, they saw and won everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.