‘ते’ दोन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:32 PM2018-05-07T22:32:51+5:302018-05-07T22:32:51+5:30

खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत शिक्षणचा अधिकार कायद्यान्वये २५ टक्के जागा आॅनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर दोन मुलाची नोंदणी संस्कार कॉन्व्हेंटमध्ये झाली.

'They' two students are deprived of education | ‘ते’ दोन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

‘ते’ दोन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीई कायद्याची पायमल्ली : शाळा संचालक व अधिकाऱ्यांचे संगनमत, पत्रपरिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत शिक्षणचा अधिकार कायद्यान्वये २५ टक्के जागा आॅनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर दोन मुलाची नोंदणी संस्कार कॉन्व्हेंटमध्ये झाली. मात्र संस्था संचालकाने काही कारणाने त्यांचे प्रवेश नाकारले. त्यामुळे ते दोन्ही मुले आज शिक्षणापासून वंचित असून शाळाबाह्य मुले म्हणून वावरत आहेत. शिक्षण विभागाचे शिक्षण संस्था संचालकांशी मधुर संबंध असल्याने त्यांना कायद्यावर बोट ठेवून अभय देण्याचे कार्य सुरू केले, असा आरोप येथे आयोजित पत्रपरिषदेत विलास वक्कलकार व नारायण निनावे यांनी केला.
आरटीई कायद्यानुसार आंधळगावातील दोन व्यक्तींनी आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर केला होता. त्यांच्या मुलांचे प्रवेश संस्कार कान्व्हेंट आंधळगाव येथे निश्चित झाले. त्यामुळे ते प्रवेशासाठी सदर कॉन्व्हेंटमध्ये गेले असता त्यांना तुम्ही आमच्या शाळेतून आॅनलाईन अर्ज का केले नाही असे बोलून त्यांना प्रवेश दिला नाही. त्यामुळे ते दोन्ही पालक हताश होवून शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेले.
शिक्षणाधिकारी यांनी संस्कार कान्हव्हेंटच्या नावे पत्र देवून त्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा आदेश दिला. तसे पत्र घेवून हे दोन्ही पालक पुन्हा त्या कान्व्हेंटमध्ये गेले असता संस्था संचालकाने त्यांना १,५०० रूपयांची मागणी केली. आरटीई कायद्यानुसार प्रवेश नि:शुल्क असल्याचे पालकांनी बोलताच संस्था संचालकाने त्या दोन्ही पालकांशी हुज्जत घालून त्यांना शाळेबाहेर काढले. प्रवेश न देण्याचे कारण विचारले असता घर व शाळेचे अंतर चुकीचे टाकले असे उत्तर दिले. आॅनलाईन अर्ज करताना घर व शाळेचे अंतर हे गुगल मॅपवरून आपोआप प्रिंट होते त्यामुळे चुकीचे अंतर टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. विशेष म्हणजे शाळा व विद्यार्थ्यांचे घर हे आंधळगावातच आहे.

प्रार्थना व खेळण्यासाठी जागाच नाही
संस्कार कॉन्व्हेंट आंधळगाव येथील संचालक नियम सांगून प्रवेश नाकारत आहेत. या कान्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांची प्रार्थना घेण्यासाठी जागा नाही. प्रार्थना सिमेंट रस्त्यावर किंवा समोरील दुसºयाच्या जागेवर घेतली जाते. खेळण्यासाठी पटांगण नाही. जेवणाच्या सुटीच्या वेळी विद्यार्थी सिमेंट रस्त्यावर खेळत असतात व पडून जखमी होतात. एवढेच नाही तर शौचालयाची सुद्धा व्यवस्था नाही. शौचालयासाठी विद्यार्थी संचालकाच्या घरी जातात. मग या कॉन्व्हेंटला कोणत्या नियमानुसार अधिकाºयांनी मान्यता दिली, असा प्रश्न उपस्थित होण्यास वाव आहे.

त्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कान्व्हेंटच्या नावे पत्र दिले होते. कॉन्व्हेंटच्या संचालकांनी प्रवेश नाकारले असेल तर पालकांनी तशी सुचना द्यायला हवी होती. जर पालकांनी तक्रार केली तर सदर कॉन्व्हेंट विरूद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
-एल.एस. पच्छापुरे, शिक्षणाधिकारी ,भंडारा.

Web Title: 'They' two students are deprived of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.