चोरांनी शेतात फोडली आलमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:50 AM2019-03-08T00:50:51+5:302019-03-08T00:51:22+5:30

सालई बु. येथे चोरट््यांनी घरातील चक्क लोखंडी आलमारी शेतात नेऊन फोडली. यात आलमारीतील २ लक्ष ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर धाडसी चोरीने सालई बु. येथे एकच खळबळ माजली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

The thieves broke into the field | चोरांनी शेतात फोडली आलमारी

चोरांनी शेतात फोडली आलमारी

Next
ठळक मुद्दे२ लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास : ५० हजार रोखीचा समावेश, सालईत धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सालई बु. येथे चोरट््यांनी घरातील चक्क लोखंडी आलमारी शेतात नेऊन फोडली. यात आलमारीतील २ लक्ष ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर धाडसी चोरीने सालई बु. येथे एकच खळबळ माजली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
जयराम गोपाळा तुमसरे रा. सालई बु. यांचे घरी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला.
यात चोरट्यांनी लोखंडी आलमारी उचलून घरापासून सुमारे १५० फूट अंतरावर शेतशिवारात उचलून नेली. सदर प्रकार तुमसरे यांना पहाटे ५ वाजता लघुशंकेला उठल्यावर लक्षात आला. चोरट्यांनी घराच्या मागील दारातून आत प्रवेश केला होता. वजनी आलमारी चोरट्यांनी १५० फूटापर्यंत वाहून नेली, हे येथे विशेष.
आलमारतीत जुन्या सोन्याच्या अंगठ्या २० ग्रॅम किंमत ४० हजार, सोनसाखळी २ नग ३० ग्रॅम ६० हजार, कानातले टॉप्स ६ ग्रॅम १२ हजार, मंगळसुत्र २ नग १०ग्रॅम २० हजार रुपये, जोंधळी पोत १५ ग्रॅम ३० हजार, तथाचांदीच्या पाटल्या १०० ग्रॅम २०हजार, कमरपट्टा ५० ग्रॅम १० हजार, पायपट्टी २ जोडी ५०ग्रॅम १० हजार, जोडवे २ नग २० हजार व नगदी ५० हजार रुपये एकुण २ लक्ष ५४ हजारांचा मुद्देमालासह रोख चोरट्यांनी चोरून नेला.
तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार रमेश गोंधुळे करीत आहेत. उन्हाळ्यात चोरट्यांची टोळी तुमसर व मोहाडी तालुक्यात सक्रीय झाली असून यापूर्वी मध्यप्रदेश तथा नागपूर, कामठी येथील टोळींनी अशी धाडसी चोरी केल्याची भुतकाळात नोंद आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरु असल्याचे समजते.
 

Web Title: The thieves broke into the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर