देव्हाडी उड्डाणपुलाचे सिमेंंट खांब तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:49 PM2019-02-12T21:49:31+5:302019-02-12T21:49:58+5:30

सिमेंट बांधकामाला मजबुती व टणकपणा येण्याकरिता काही दिवस योग्य क्युरिंग पाणी घालणे करण्याची गरज असते. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलाचा मुख्य सिमेंट खांब पाण्याविना कोरडा दिसून येतात. खांबावर केवळ पोत्यांचे तुकडे आच्छादीत केले आहे. हजारो टनांचा भार सहन करणाऱ्या सिमेंट खांबाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तहानलेले सिमेंट खांब हजारो टनाचे वजन कसे सहन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Thirsty cement pillars of the Devidi flyover | देव्हाडी उड्डाणपुलाचे सिमेंंट खांब तहानलेले

देव्हाडी उड्डाणपुलाचे सिमेंंट खांब तहानलेले

Next
ठळक मुद्देमजबुतीकरणावर प्रश्नचिन्ह : पाण्याचा अत्यल्प वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिमेंट बांधकामाला मजबुती व टणकपणा येण्याकरिता काही दिवस योग्य क्युरिंग पाणी घालणे करण्याची गरज असते. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलाचा मुख्य सिमेंट खांब पाण्याविना कोरडा दिसून येतात. खांबावर केवळ पोत्यांचे तुकडे आच्छादीत केले आहे. हजारो टनांचा भार सहन करणाऱ्या सिमेंट खांबाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तहानलेले सिमेंट खांब हजारो टनाचे वजन कसे सहन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देव्हाडी येथील मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील कॉसिंग क्रमांक ५३१ वर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून सिमेंट खांबाचे पिल्लर दोन्ही बाजूला बांधकाम सध्या सुरू आहे. खांब मोठे व प्रशस्त आहेत. खांबात लोखंडी सळाखी, सिमेंट, रेती, गिट्टीचा वापर केला जात आहे. १५ ते १७ फुट उंच खांबाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. पूर्णत्वास आलेल्या सिमेंट खांबावर पाणी अल्प प्रमाणात घालण्यात येत आहे. दिवसातून केवळ दोन ते तीनदाच प्लॉस्टिक पाईपने पाण्याचा फवारा मारण्यात येते. दिवसभर सदर खांब कोरड्या स्थितीत असतो.
बांधकामानंतर किमान २० ते ३१ दिवस सतत पाणी घालून बांधकाम ओलसर ठेवणे गरजेचे आहे. उड्डाणपुलाचे खांब आहेत. खांब सतत ओले करण्याची गरज आहे. हजारो टन वजन या खांबावर राहणार आहे. उड्डाणपूलाचे किमान आयुष्य शंभर वर्षाचे आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्वक व मजबुतीला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.

सिमेंट बांधकामाला पाण्याची विशेष गरज आहे. पाण्यामुळे त्याला मजबुती येते. येथे केवळ थातुरमातूर पाणी सिमेंट खांबावर घालण्यात येते. त्यामुळे खांबाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-सुधाकर कारेमोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुमसर.

Web Title: Thirsty cement pillars of the Devidi flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.