यंदा रब्बीत कडधान्य व गळीत धान्यात मका पिकाची मुसंडी

By युवराज गोमास | Published: February 20, 2024 02:04 PM2024-02-20T14:04:56+5:302024-02-20T14:05:11+5:30

मोहरी, पोपट पडले मागे : जिल्ह्यात ९०४ हेक्टरवर मकाची लागवड

This year, there is a harvest of maize crop in the rabbit pulses and grain crops | यंदा रब्बीत कडधान्य व गळीत धान्यात मका पिकाची मुसंडी

यंदा रब्बीत कडधान्य व गळीत धान्यात मका पिकाची मुसंडी

भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील मागणीनुसार पिकांचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच यंदा रब्बीतील गळीत व कडधान्य पिकांत मका पिकाने मुसंडी मारली आहे. मोहरी, मसूर, जवस, पोपट आदी पिकांचा पेरा मकाच्या तुलनेत मागे पडल्याचे चित्र जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहे. शेतकऱ्यांना मका पिकाने भुरळ पाडले आहे. जिल्हयात यंदा शेतकऱ्यांनी ९०४ हेक्टर क्षेत्रात मका लागवड केली आहे. जिल्ह्यातील रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ४८,४४८ हेक्टर क्षेत्र असताना ९०४ हेक्टरमध्ये मकाची लागवड झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मका पिकाने भुरळ घातले, असेच म्हणता येईल.

धानाची शेती आता परवडणारी नाही, असे चित्र जिल्ह्यात अनेक हंगामावरून दिसून येत आहे. अतिवृष्टी, महापूर व वादळी अवकाळी पाऊस यामुळे हाती आलेले धानाचे पीक वाया जात आहे. त्यातच कीड व रोगांमुळे होत्याचे नव्हते होत आहे. कित्येकदा लागवड खर्चही निघत नसल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी गरिबीत खितपत पडला आहे. त्यामुळेच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळण्याचा सल्ला दिला जातो. शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतकरी होण्यास सांगितले जात आहे. त्याचे फलित आता दिसून येत आहेत. जिल्ह्यात कडधान्य व गळीत पिकांच्या पेऱ्यात मका पिकाने मुसंडी मारली आहे.
बॉक्स

जिरायती गहू व ज्वारीपेक्षा मका वरचढ
जिल्ह्यात ज्वारी ३४९ हेक्टर, पोपट ७७५, मसूर २७७, जवस ८१७, मोहरी ८०२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तर मका पिकाची लागवड ९०४ हेक्टरवर करण्यात आली आहे. सध्या मकाचे पीक जोमदार आल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे.

लागडीत जीरायती गहू सुद्धा मागे पडले आहे. आरोग्यासाठी गव्हापेक्षा मका व ज्वारी अतिशय फायद्याची असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात बागयती गव्हाचे १० हजार ७४६ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
बॉक्स

मका लागवडीत साकोली आघाडीवर
जिल्ह्यात मकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असतानाच साकोली तालुका लागवडीत आघाडीवर आहे. साकोली तालुक्यात ५३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड होवून अव्वल ठरला आहे. दुसरा क्रमांक लाखनी तालुक्याने पटकाविला असून लागवड क्षेत्र २४१ इतके आहे. अन्य तालुक्यांत मात्र नाममात्र पीक घेतले जात आहे.

फायबरची कमतरता भरण्यासाठी मका गुणकारी

मकापासून कॉर्न तयार केले जातात. कार्नमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. कॉर्न तुम्हाला १५ टक्के फायबर देते, ज्यापैकी ९ टक्के विद्राव्य आहे. आहारातील फायबरच्या कमतरतेमुळे कर्करोग, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या दिसून येतात आणि कॉर्न त्यापासून आपले संरक्षण करते. कॉर्न अँटी ऑक्सिडंट्स देखील असतात. 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वे असतात. जी त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच मका झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, लोह आणि मॅगनीज कमतरता भरून काढते.
बॉक्स

तालुकानिहाय मका लागवड क्षेत्र
तालुका लागवड क्षेत्र हे.

भंडारा १४
मोहाडी १६

साकोली ५३२
तुमसर ०७

पवनी ००
लाखांदूर १२१

लाखनी २१४
एकूण ९०४

 

Web Title: This year, there is a harvest of maize crop in the rabbit pulses and grain crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.