‘त्या’ २८ गावांना पुराचा धोका आजही कायम

By admin | Published: July 5, 2016 01:08 AM2016-07-05T01:08:27+5:302016-07-05T01:08:27+5:30

दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील २८ गावांना पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यंदा हवामान खात्याने चांगल्या

'Those' 28 villages are still in danger of flooding | ‘त्या’ २८ गावांना पुराचा धोका आजही कायम

‘त्या’ २८ गावांना पुराचा धोका आजही कायम

Next

लाखांदूर : दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील २८ गावांना पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचे शुभवर्तन केल्याने चुलबंद व वैनगंगा नदी काठावरील ‘त्या’ २८ गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका सहन करावा लागणार आहे. मात्र तालुका प्रशासनाच्या योग्य नियोजनाने सतर्कता सुध्दा बाळगली जाते. तालुक्यातील चुलबंद नदी काठावरील १७ तर वैनगंगा नदीकाठावरील ११ गावे पुर परिस्थितीचा दरवर्षी सामोरे जातात.
वाहतुकीच्या दृष्टीने लाखांदुर तालुक्यातील अंतर्गत खेडेगावाना जोडणारी मार्ग सुध्दा नाले भरभरुन वाहत असल्याने बंद पडुन तालुक्याशी संपर्क तुटतो. भंडारा शहराजवळील पाणी पातळीबाबद इशारा पातळी ९.०० मिटर तर धोक्याची पातळी ९.५० मिटर एवढी आहे. लाखांदुर तालुक्याचा २० वर्षाचा पुर परिस्थितीचा आढावा बघीतला असता १९९४ ला आलेल्या महापुराने जनजिवन विस्कळीत करुन टाकले होते. पुरात अडकलेल्यांना हेलीकॉप्टरने सुरक्षित स्थळी बाहेर काढावे लागले होते. त्यानंतर १४ ते १७ सप्टेंबर २००५. दि. १३ ते १७ आॅगस्ट २००६ दरम्यान मोठी पुरपरिस्थीती ओढवली होती. विविध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थित हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंमलात आणला. या कायद्यातील तरतुदीला अनुसरुन महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाची स्थापना करण्यात आली होती.
पुरामुळे त्या नदीकाठावरील २८ गावांना फटका बसत असला तरी त्याहीपेक्षा चौरास भागात शेकडो हेक्टर धानपिक दरवर्षी पाण्याखाली सापडते. वैनगंगा नदीकाठावरील आवळी, तर चुलबंद नदीकाठावरील खोलमारा/ बु. या गावाचा दरवर्षी तालुक्याशी संपर्क तुटतो.
या दोन्ही पुरग्रस्त गावांचे शासनाने यापुर्वी पुनर्वसन केली होते. परंतु पुनर्वसन करताना शासनाने पुर्णपणे मदतकार्य व अटी, शर्तीची पुर्तता न केल्याने आमचे पुनर्वसन झालेच नसल्याचे समजुन दोन्ही पुरग्रस्त गावानी ते गाव सोडले नाही. असे पुरग्रस्तांचे म्हणने आहे. गोसेखुर्द धरणाच्या कालव्याचे जाळे संपुर्ण चौरास भागात पसरले आहेत. अनेक ठिकाणी कालवे खंडित असल्याने पवनी तालुक्यातील पाण्याचा येणारा लोंढा चौरास भागात पसरतो.
पाणी निघण्याचा पुढे मार्ग नसल्याने हजारो हेक्टर शेतजमीन जलमय होते. ही परिस्थिती जास्त दिवसाची रहिल्यास धानपिक सडुन शेतकरी संकटात सापडतो. हा प्रसंग अनेकदा घडला. यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधून आर्थिक मदतीची मागणी केली पंरतु काही एक अर्थ झाली नाही.
तालुक्यातील किरमटी, गवराळा, रोहणी, विरली/खु. मोहरणा, ओपारा, ईटान, नांदेड, खैरी, टेंभरी, विहीरगाव, आवळी, नांदेड हे वैनगंगा काठावरील तर चुलबंद नदीकाठावरील सोनी, धर्मापुरी, पाऊलदवना बोथली, परसोडी मांढळ किन्ही आसोला, आथली, भागडी, खैरी/पट, चप्राड किन्हाळा, लाखांदूर, चिचोली, खोलमारा, बारवा ही गावे पुरामुळे प्रभावीत होतात.
प्रकल्पामध्ये संजय सरोवर मध्यप्रदेश तर धरणामध्ये शिरपुर पुजारिटोला, कालीसराड, इटीयाडोह धरणामुळे लाखांदुर तालुक्यात पुरपरिस्थिती ओढवते. (तालुका प्रतिनिधी)

पुराचा धोका तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदी काठावरील गावांना बसतो. आपत्ती निवारण कक्षाची स्थापना केली. त्या त्या गावातील कोतवाल तलाठी, सरपंचांना तालुक्याशी संपर्क ठेवुन वेळोवेळी माहिती पुरण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या. तालुक्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन त्यावर मात करण्यासाठी सज्ज आहे. पुरपरिस्थितीत नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे.
-विजय पवार,
तहसिलदार , लाखांदूर

Web Title: 'Those' 28 villages are still in danger of flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.